Virat Kohli Was Crying Varun Dhawan Reveals Shocking Video: विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्याची पत्नी अनुष्का शर्माही त्याच्याबरोबरच तिथे आहे. विराटने पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावून फॉर्मात आल्याचे संकेत दिले होते. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. यानंतर त्याच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढेच नाही तर काही लोक त्याला निवृत्तीचा सल्लाही देत ​​आहेत. पण याचदरम्यान विराटचं क्रिकेटवर किती प्रेम आहे याचा एक किस्सा बॉलीवूड अभिनेता वरूण धवन याने सांगितला आहे.

वरुण धवन यूट्यूब कंटेंट क्रिएटर रणवीर अलहबादियाच्या पोडकास्टमध्ये पोहोचला होता. यादरम्यान बोलताना अनुष्का शर्माचे त्याने कौतुक केले आणि विराट कोहलीच्या यशात तिची किती महत्त्वाची भूमिका आहे, हेही सांगितले. धवनने २०१८ मधील नॉटिंगहॅम कसोटीमधील घटना सांगितली, जेव्हा विराट कोहली रडत होता आणि संघाचा कर्णधारही होता.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Virat Kohli & Anushka Sharma visit premanand ji maharaj at vrindavan
Video : विराट कोहली सहकुटुंब पोहोचला वृंदावनमध्ये! प्रेमानंद महाराजांशी काय संवाद झाला? अनुष्का शर्मा म्हणाली, “अनेक प्रश्न…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”

हेही वाचा – Virat-Anushka: विराट-अनुष्का भारत सोडून ‘या’ देशात कायमचे होणार स्थायिक, कोचने दिली धक्कादायक माहिती

धवनने सांगितले की, जेव्हा तो अनुष्काबरोबर सुई-धागा चित्रपटाचे शूटिंग करत होता, तेव्हा विराट कोहलीबद्दल चर्चा झाली होती. २०१८ च्या त्या कसोटी मालिकेतील पराभवासाठी विराटने स्वत:ला जबाबदार ठरवलं होतं आणि नेमकं तेव्हा काय घडलं होतं हे तिने वरूण धवनबरोबर शेअर केलं होतं.

विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. यादरम्यान वरूण धवनने अनुष्का शर्माने शेअर केलेला किस्सा सांगताना म्हणाला, विराट म्हणजे त्याने खूप काही सहन केलं आहे. जेव्हा तो चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता, तेव्हा अनुष्काने त्याच्या मानसिक स्थितीबद्दल माझ्याबरोबर काही गोष्टी शेअर केल्या होत्या.

हेही वाचा – R Ashwin: “मला हार्टअटॅक आला असता…”, अश्विनला निवृत्तीच्या दिवशी कोणी केला कॉल? पोस्टमध्ये स्क्रिनशॉट शेअर करत म्हणाला

पुढे सांगताना वरूण म्हणाला, कदाचित ती नॉटिंगहम कसोटी होती. जिथे भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यादिवशी अनुष्का तो सामना पाहायला गेली नव्हती. पण जेव्हा त्या सामन्यानंतर परत आली तेव्हा तिला माहित नव्हतं की विराट कोहली नेमका कुठे आहे. जेव्हा ती खोलीत गेली तेव्हा तो खूपच खचला होता आणि विराट रडत होता. विराटला तेव्हा वाटतं होतं की तो अपयशी ठरल्याने संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पण विराटच सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. तो संघाचा कर्णधारही होता.

हेही वाचा – R Ashwin Retirement: “जर विराट कर्णधार असता तर त्याने अश्विनला निवृत्ती घेऊ दिली नसती…”, पाकिस्तानच्या खेळाडूचं मोठं वक्तव्य

विराट कोहलीने इंग्लंडच्या दौऱ्यावरील त्या नॉटिंगहम कसोटीत १४९ आणि ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. पण इंग्लंडच्या गोलंदाजी माऱ्यापुढे भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यादरम्यान विराट कोहलीच्या खांद्यावर संघाची धुरा होती.

Story img Loader