Virat Kohli shared two Instagram stories: आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भाग घेण्यासाठी भारतीय संघ तेथे पोहोचला आहे. या मालिकेतील पहिला सामना १२ जुलैपासून खेळवला जाणार आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सराव सुरू केला आहे. या मालिकेत सर्व चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा विराट कोहलीच्या कामगिरीवर खिळल्या आहेत. अशात आता विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीने ४ जुलै रोजी इन्स्टाग्रामवर दोन स्टोरी शेअर केल्या आहेत. त्याच्या दोन्ही पोस्ट्स चाहत्यांना समजणे सोपे नाही. याकडे एक गूढ पोस्ट म्हणूनही पाहिले जात आहे, ज्यामध्ये कोहली हातवारे करून आपले म्हणणे मांडताना दिसत आहे.

कोहलीने शेअर केलेल्या दोन स्टोरीमध्ये, पहिल्यामध्ये त्याने बौद्ध भिचू थिच न्हाट हान्चा कोट शेअर केला आहे. ‘आपण सर्व एकाच झाडाची पाने आहोत असे लिहिले आहे. आपण सर्व एकाच महासागराच्या लाटा आहोत.’ दुसऱ्या पोस्टमध्ये कोहलीने तत्त्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांचे फ्रीडम फ्रॉम द नॉन हे पुस्तकातील एक पॅरा शेअर केला आहे. त्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘जर तुम्ही स्वतःची इतरांशी तुलना केली नाही तर तुम्ही जे आहात तेच राहाल. तुलनेने तुम्ही अधिक हुशार, अधिक सुंदर, पुढे होण्याची आशा कराल, पण तुम्ही असे कराल का? यामुळे तुमची ऊर्जा खराब होईल. कोणत्याही तुलनेशिवाय स्वत:ला पाहिल्याने तुम्हाला खूप ऊर्जा मिळेल.’

विराट कोहलीची पहिली इन्स्टाग्राम स्टोरी

कोहलीने अशी पोस्ट शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही –

विराट कोहलीची दुसरी इन्स्टाग्राम स्टोरी

विराट कोहलीने सोशल मीडियावर अशा रहस्यमय पोस्ट शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, त्याने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्याच्या चौथ्या दिवशी आणि सामना संपल्यानंतर पुन्हा अशाच पोस्ट शेअर केल्या होत्या. यामध्ये त्यांनी अंतिम सामन्यानंतर पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये मौन हा महान शक्तीचा स्रोत असल्याचे लिहिले होते.

हेही वाचा – IND vs WI: कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाने घेतली सर गारफिल्ड सोबर्सची भेट, बीसीसीआयने शेअर केला VIDEO

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भारत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli who is on west indies tour shared two instagram stories vbm