Glenn Philips Stunning Catch Caught Out Virat Kohli: भारत वि. न्यूझीलंड यांच्यातील महत्त्वाचा सामना दुबईत खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. यादरम्यान भारताचे तिन्ही टॉप फलंदाज स्वस्तात बाद झाले. आपला तीनशेवा वनडे सामना खेळत असलेला विराट कोहलीही एका आश्चर्यचकित झेलमुळे झेलबाद झाला. न्यूझीलंडचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असलेल्या ग्लेन फिलिप्सने एका अनपेक्षित झेलने विराटसह संपूर्ण भारतीयांच्या मोठी खेळी पाहण्याच्या आशा संपुष्टात आल्या.

न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने विराटला अवघ्या काही सेकंदात झेलबाद करत माघारी धाडलं. ग्लेन फिलिप्स त्याच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो आणि या सामन्यातही त्याने आपल्या अप्रतिम झेलने सर्वांना आश्चर्यचकित केले. चौकारासाठी दणदणीत मारलेल्या फटक्यावर फिलिप्सने टिपलेला चेंडू पाहून विराटही जागच्या जागी स्थिरावला.

विराट कोहली या सामन्यात १४ चेंडूत केवळ ११ धावाच खेकरू शकला. यावेळी त्याच्या बॅटमधून २ चौकार पाहायला मिळाले. मॅट हेन्रीने विराट कोहलीची विकेट घेतली, पण या विकेटमध्ये ग्लेन फिलिप्सचे मोठे योगदान होते. मॅट हेन्रीने टीम इंडियाच्या डावातील ७वे षटक टाकण्यासाठी आला होता.

या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हवेत धारदार फटका लगावला. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या ग्लेन फिलिप्सच्या दिशेने चेंडू हवेत गेला आणि त्याने हवेत उजव्या बाजूला झेप घेत नेत्रदीपक झेल टिपला. ०.६२ सेकंदात फिलिप्सने रिअॅक्ट करत हा झेल टिपला. ग्लेन फिलिप्सने हा चेंडू टिपत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. फिलिप्स त्याच्या कमाल क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो, त्याने अनेकदा असे अनपेक्षित झेल टिपले आहेत. पण विराट कोहलीचा हा झेल कॅच ऑफ द टूर्नामेंट असल्याची चर्चा सुरू आहे.

ग्लेन फिलिप्सने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये दुसऱ्यांदा असा झेल टिपला आहे. यापूर्वी त्याने पाकिस्तानविरुद्धही असाच अनपेक्षित झेल टिपला होता. त्याने मोहम्मद रिझवानने विल्यम ओ’रुर्कचा एक चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने टिपत रिझवानला झेलबाद केले. यानंतर विराट कोहलीचाही झेल त्यानेच अशाच पद्धतीने टिपला आहे.

Story img Loader