IND vs BAN Virat Kohli Dismissed by Net Bowler: भारत वि बांगलादेशमधील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबर म्हणजेच आजपासून खेळवला जाणार आहे. पण पावसामुळे सामन्याची नाणेफेक उशिरा होणार आहे. सामन्यापूर्वीच्या आदल्या दिवशी मैदानात सराव करतानाचा विराट कोहलीचा एक किस्सा समोर आला. विराट कोहली कानपूरमध्ये सराव करत असताना नेट बॉलरने त्याला दोन वेळा बाद केले आणि त्याच्यासमोर विराट फार काळ टिकू शकला नाही.

भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना 280 धावांनी जिंकला. युवा फलंदाज शुबमन गिल आणि युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांनी संघाकडून शतकी खेळी खेळली. मात्र, स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट शांत राहिली. चेन्नईपाठोपाठ कोहली कानपूरमध्ये नेट प्रॅक्टिसदरम्यान संघर्ष करताना दिसला.

bangladesh porn star arrested in ulhasnagar
Porn Star Riya Barde Arrested: बांगलादेशी पॉर्न स्टारला उल्हासनगरमधून अटक; रिया बर्डे नावानं सहकुटुंब करत होती वास्तव्य!
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Akshay Shinde Shot Dead Badlapur Sexual Assault Case Amit Thackeray Remark
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवरून अमित ठाकरेंच्या पोस्टने वेधलं लक्ष; फडणवीसांसह विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…

हेही वाचा – IND vs BAN: दुसऱ्या कसोटीत ९३ टक्के पावसाची शक्यता, कानपूरचू खेळपट्टी कोणाला करणार मदत? वाचा हवामान आणि पिच रिपोर्ट

विराट कोहलीने अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांचा नेटमध्ये सामना केला, तेव्हाही तो धावा करण्यासाठी खूप धडपडत होता. इतकंच नाही तर नेट बॉलर जमशेद आलमच्या चेंडूवर कोहलीॉ अडचणीत सापडला होता. लखनौच्या या खेळाडूने कोहलीला दोनदा बाद केले. आलमच्या गोलंदाजीवर कोहली प्रभावित झालेला दिसला. जमशेद आलम विराटला १३० च्या वेगाने गोलंदाजी करत होता आणि विराट यापैकी ४ षटकांत २ वेळा बाद झाला. या सरावानंतर जमशेदने माध्यमांशी बोलताना किस्सा सांगितला.

हेही वाचा – Shakib Al Hasan: शकिब अल हसनने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती, म्हणाला, “…नाही तर भारताविरूद्धची टेस्ट अखेरचा सामना”

जमशेद आलम विराटबाबत सांगताना NDTV ला सांगताना म्हणाला, “मी विराट कोहलीला २४ चेंडू टाकले. १३५ च्या वेगाने गोलंदाजी करताना मी त्याला दोन वेळा बाद केलं. सरावाची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना मदत करणारी होती, तर कानपूरची खेळपट्टी सहसा फिरकीसाठी अनुकूल असते. तितक्यात माझी गोलंदाजी पाहून विराट कोहली म्हणाला, चांगली गोलंदाजी केलीस रे, किती वर्षाचा आहे, मी त्याला म्हटलं, २२ वर्षांचा आहे. यावर विराटने उत्तर दिलं, मेहनत करत राहा. विराट कोहलीला बाद केल्यानंतर मला जग जिंकल्यासारखं वाटलं.” जमशेद आलमने संयमी वेगवान गोलंदाजी करत विराटला बाद केले. जमशेद आलमने दोनदा आउट-स्विंगिंग चेंडू टाकून विराटची विकेट घेण्यात यश मिळविले.

हेही वाचा – VIDEO: युवराज सिंगला गर्लफ्रेंड अभिनेत्रीच्या गुलाबी ‘स्लिप-ऑन्स’ घालून जावं लागलं एअरपोर्टवर, ‘तिचं’ नाव सांगण्यास दिला नकार

Virat Kohli With Net Bowlers
विराट कोहली नेटमध्ये सराव करताना

आता जे नेटमध्ये दिसले ते बांगलादेशविरुद्ध कानपूर कसोटीतही पाहायला मिळाले तर विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची आशा सोडून द्या. असो, त्याने कानपूरमध्ये याआधी कुठे काही विशेष केले आहे? 2016 मध्ये, तो कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकमेव कसोटी खेळला. ज्यामध्ये त्याने पहिल्या डावात 9 धावा आणि दुसऱ्या डावात 18 धावा म्हणजे एकूण 27 धावा केल्या. आणि, नेट बॉलर जमशेद आलमने ज्या प्रकारे त्याचा पर्दाफाश केला आहे, त्यावरून बांगलादेशविरुद्धही विराटच्या चांगल्या कामगिरीबद्दल काहीही सांगता येणार नाही.

विराटला बाद करणाऱ्या नेट बॉलरने सांगितले की, त्यानेही चेंडू रोहित शर्माकडे टाकला पण तो त्याची विकेट घेण्यात अपयशी ठरला. त्याने असेही सांगितले की त्याच्याशिवाय बुमराह आणि सिराजने देखील नेटमध्ये विराट कोहलीला चेंडू टाकला, ज्यामध्ये बुमराहने त्याला एकदा बाद केले. म्हणजे एकूण विराट कोहली नेट प्रॅक्टिस दरम्यान ३ वेळा बाद झाला.