Virat Kohli taken most catches against Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून (शुक्रवार) पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला या मोठ्या मालिकेत अनेक विक्रम मोडण्याची संधी आहे. कोहली केवळ बॅटनेच नाही तर क्षेत्ररक्षण करतानाही अनेक मोठी कामगिरी करू शकतो. तो एक मोठा विक्रम करण्याच्या जवळ आहे, ज्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑस्ट्रेलियाची मैदानं ही विराट कोहलीच्या आवडत्या मैदानांपैकी एक आहेत, जिथे त्याने आपल्या बॅटने खूप धावा केल्या आहेत. असा देश जिथे तो नेहमीच आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात यशस्वी ठरला आहे. यावेळी कोहलीला फलंदाजीत अनेक विक्रमांसह आपल्या वर्चस्वाची आठवण करून देण्याची संधी आहेच, पण क्षेत्ररक्षण करताना त्याला इतिहास रचण्याचीही संधी आहे.

विराट जगातील पहिला क्रिकेटर ठरणार –

खरेतर, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत कोहलीने चार झेल घेण्यात यश मिळवले, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये ७० झेल (विकेटकीपर नसलेल्या) घेणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू ठरेल. ३६ वर्षीय कोहली आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू आहे. त्याच्या आधी ही कामगिरी भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या नावावर होती.

हेही वाचा – IND vs AUS : हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी पर्थ कसोटीत पदार्पण करणार? जाणून घ्या त्यांचा आतापर्यंतचा प्रवास?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक झेल (विकेटकीपर नसलेले) घेणारे खेळाडू –

विराट कोहली – ६६
राहुल द्रविड – ६३
इयान बोथम – ६२
जो रूट – ५८
कार्ल हॉपर – ५७
सचिन तेंडुलकर – ५४

विराट कोहली पॉन्टिंगला मागे टाकणार –

सध्या जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत ३५० धावा करताच मोठा विक्रम नोंदवणार आहे. तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला मागे टाकेल. ज्यामुळे तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.

हेही वाचा – IND vs AUS : बुमराह आणि कमिन्स मिळून नोंदवणार अनोखा विक्रम! कसोटीच्या क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा असं घडणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज –

१. सचिन तेंडुलकर (भारत) – ३४३५७ धावा
२. कुमार संगकारा (श्रीलंका) – २८०१६ धावा
३. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – २७४८३ धावा
४. विराट कोहली (भारत) – २७१३४ धावा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli will become the first player in the world to take 70 catches against australia after taking four catches in ind vs aus test vbm