Virat Kohli and Sam Konstas Fight ICC Rule Explained: भारत ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी मेलबर्नमध्ये खेळवली जात आहे. या कसोटीच्या पहिल्याच दिवशी मैदानावर बरंच काही घडलं. पण विराट आणि ऑस्ट्रेलियाचा पदार्पण करणारा सलामीवीर सॅम कोन्स्टास यांच्यातील धक्काबुक्कीने सर्वाधिक लक्ष वेधलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केलेल्या १९ वर्षीय कोन्स्टासने विस्फोटक फलंदाजी करत ६० धावांची अप्रतिम खेळी केली. पण विराट कोहलीबरोबर झालेली धक्काबुक्की आता विराटच्या अंगलट येणार अशी चर्चा केली जात आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील १०वे षटक संपल्यानंतर ही घटना घडली. ओव्हर संपताच विराट कोहली समोरून येतो आणि सॅम कॉन्स्टन्सही समोरून चालत येत होता आणि एकमेकांचा धक्का लागला. यानंतर दोघांमध्ये वादावादी सुरू झाली आता विराट कोहलीने हे जाणूनबुजून केले की अजाणतेपणी, या प्रकरणाबाबत कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी ICC प्रथम घटनेची चौकशी करेल. पण, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला आधीच वाटत आहे की विराट कोहलीची चूक आहे.

हेही वाचा – IND vs AUS: “मैदानावर जे काही…”, विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीवर सॅम कोन्स्टासचं वक्तव्य, पाहा नेमकं काय म्हणाला?

कोन्स्टास आणि विराटच्या या धक्काबुक्कीचा व्हीडिओ पाहिला तर विराट कोहली समोरून कुठून चालत होता हे त्याला माहित होतं. तर कोन्स्टास खाली पाहून त्याचे ग्लोव्हज नीट करत होता. रिकी पाँटिंगनेही याकडेच सर्वांचे लक्ष वेधले. पाँटिंग म्हणाला, विराट कोहली कुठून चालतोय पाहा, विराट पूर्ण खेळपट्टीवर चालत होता आणि त्यानेच हा वाद सुरू केला आहे. याबाबत मला काहीच शंका नाही.

हेही वाचा – IND vs AUS : विराट आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात झाली धक्काबुक्की! पंचांसह ख्वाजाला करावी लागली मध्यस्थी, पाहा VIDEO

आयसीसीचा नियम काय सांगतो?

मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) च्या मते, “दुसऱ्या खेळाडूशी अयोग्य आणि जाणूनबुजून शारीरिक संपर्क करणे” हा लेव्हल २ गुन्हा आहे. हे MCC कायद्याच्या नियम ४२.१ अंतर्गत येते. मैदानावरील पंचांनी कोणत्याही खेळाडूने आचारसंहितेचा भंग केल्याचे निदर्शनास आणल्यास त्यानंतर सामनाधिकारी अंतिम निर्णय घेतात. जर पंच आणि सामनाधिकारी यांनी कोहलीने कोन्स्टासला जाणूनबुजून धक्का दिला हे ठरवले तर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) कडक निर्बंध लागू शकतात.

हेही वाचा – IND vs AUS : बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे काय? ज्यामध्ये आतापर्यंत टीम इंडियाची कशी राहिलेय कामगिरी? जाणून घ्या

लेव्हल 2 च्या गुन्ह्यांसाठी तीन ते चार डिमेरिट पॉइंट्सचा दंड आहे, संबंधित शिक्षा खालीलप्रमाणे
१.५०% ते १००% मॅच फी दंड किंवा १ निलंबन पॉइंट
२. २ डिमेरिट पॉईंट, ४ पॉईंट झाल्यास खेळाडूला निलंबित केले जाते.

डिमेरिट गुण २४ महिन्यांच्या कालावधीसाठी खेळाडूच्या रेकॉर्डमध्ये राहतात. विराट कोहलीला २०१९ पासून एकही डिमेरिट पॉइंट मिळालेला नाही. सामनाधिकाऱ्यांनी कोहलीला चार डिमेरिट पॉइंट दिल्यास, त्याचा परिणाम एक कसोटी किंवा दोन मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी निलंबनात होईल. याचा अर्थ कोहलीला सिडनीमध्ये ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीला मुकावे लागण्याची शक्यता आहे. भारतीय संघ व्यवस्थापन किंवा कोहली स्वत: लादलेल्या कोणत्याही निर्बंधांविरुद्ध अपील करू शकतात. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला २०१८ मधील मालिकेदरम्यान स्टीव्ह स्मिथशी संपर्क साधल्याबद्दल सुरुवातीला तीन डिमेरिट गुण देण्यात आले होते.

Story img Loader