विराट कोहलीकडे जोखीम पत्करण्याची उत्तम क्षमता आहे. तो भारताची परदेशातील कसोटीमधील कामगिरी सुधारू शकेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा महान यष्टीरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्टने व्यक्त केला.
‘‘कोहलीची नैसर्गिक आक्रमक वृत्ती संघाला नवे रूप प्राप्त करून देऊ शकेल. कोणतीही जोखीम पत्करण्यासाठी तो सज्ज असतो, हेच सकारात्मक गुण संघाला पुढे घेऊन जाऊ शकतात,’’ असे गिलख्रिस्टने सांगितले.
कोलंबोत भारताने श्रीलंकेविरुद्ध मिळवलेला विजय हा नऊ कसोटी सामन्यांनंतर प्राप्त झालेला आहे. परंतु कर्णधार म्हणून कोहलीला मिळालेला हा पहिला विजय. कोहलीच्या नेतृत्व गुणाविषयी गिलख्रिस्ट म्हणाला, ‘‘कोहली आणि क्लार्कमध्ये साम्य आहे. क्लार्कसुद्धा जोखीम पत्करणारा संघनायक आहे. त्याकरिता तो विजयाची संधी असतानाही पराभवाची तमा बाळगत नाही. जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल फलंदाज म्हणून नावलौकिक मिळवणारा क्लार्क आता निवृत्त झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचा तो सच्चा सेवक आहे.’’

Story img Loader