आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहली 1 एप्रिलला आगामी 14व्या मोसमासाठी संघात सामील होईल. विराटच्या समावेशानंतर दोन दिवसात हा संघ चेन्नईत प्रशिक्षण शिबिराला सुरुवात करेल. 9 एप्रिलला आरसीबी आपला पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई येथे खेळणार आहे.

एका अहवालानुसार विराटलासुद्धा एक आठवड्यासाठी क्वारंटाइन राहावे लागणार आहे. हा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्याला बायो बबलमध्ये प्रवेश मिळेल. इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर विराट बायो बबलमधून बाहेर पडला. जानेवारीच्या उत्तरार्धापासून तो बायो बबलमध्ये होता.

विराटने कोहलीने तिसर्‍या वनडेनंतर सामन्यांच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. बायो बबलमध्ये खेळणे कठीण असल्याने अधिकाऱ्यांनी याची काळजी घ्यावी, असे त्याने म्हटले होते. रविवारी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मिळालेल्या विजयानंतर विराट म्हणाला की, भविष्यातील कार्यक्रमांची काळजी घेतली पाहिजे.

“सातत्याने बायो बबलमध्ये राहिल्यामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करताना खेळाडूंच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी. भविष्यातील कार्यक्रमांवर लक्ष देणे आवश्यक आहे, विशेषत: अशा वेळी बायो बबलमध्ये खेळणे कठीण आहे आणि सर्व लोकांमध्ये नेहमीच समान क्षमता नसते. मला खात्री आहे की भविष्यात या गोष्टींवर चर्चा होईल”, असे विराटने सांगितले.

भारतीय संघ अलीकडे खूप व्यस्त आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आयपीएल 2020 नंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौरा केला. त्यानंतर विराटसेनेने इंग्लंडविरुद्ध देशात कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि टी-20 वर्ल्डकप पाहता या मालिका महत्त्वाच्या होत्या,