World Cup 2023, Sunil Gavaskar on Virat Kohli: विराट कोहली ५ नोव्हेंबर २०२३ रोजी त्याचा ३५वा वाढदिवस साजरा करणार आहे, ज्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. आजकाल, किंग कोहली भारतात सुरू असलेल्या क्रिकेटच्या महाकुंभ दरम्यान म्हणजेच क्रिकेट विश्वचषक २०२३ दरम्यान त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे. किंग कोहली त्याच्या वाढदिवशी कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळणार आहे. कोहलीच्या ३५व्या वाढदिवसापूर्वी भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे.

लिटल मास्टर सुनील गावसकर म्हणतात की, “कोहली त्याच्या वाढदिवशी म्हणजेच ५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ५०वे वन डे शतक झळकावणार आहे. कोहलीने वन डेतील शतकांच्या बाबतीत आतापर्यंत ४८चा आकडा गाठला आहे. गेल्या रविवारी (२२ ऑक्टोबर) धरमशाला येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कोहलीने ९५ धावांची खेळी खेळली आणि मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला आणि शतकापासून वंचित राहिला.”

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IPL Auction Who is Vaibhav Suryavanshi 13 Year Old Batter Becomes Youngest Player in IPL 2025 Mega Auction 2025 List
IPL 2025 Auction: कोण आहे वैभव सूर्यवंशी? आयपीएल लिलावात उतरणार फक्त १३ वर्षांचा भारतीय खेळाडू, ऑस्ट्रेलियाविरूद्ध झळकावलंय जलद शतक
IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
Kal Ho Naa Ho Re-Release
२१ वर्षांनंतर पुन्हा रिलीज होणार शाहरुख खान-प्रीती झिंटाचा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट; गाण्यांनी प्रेक्षकांना लावलेलं वेड
actor himansh kohli wedding photos out
बॉलीवूड अभिनेत्याने मंदिरात साधेपणाने केलं अरेंज मॅरेज; लग्नातील फोटो आले समोर

‘स्टार स्पोर्ट्स’वर बोलताना सुनील गावसकर म्हणाले, “कोहली ५ नोव्हेंबरला त्याच्या वाढदिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याचे ५०वे एकदिवसीय शतक झळकावणार आहे.” याआधी टीम इंडिया २९ ऑक्टोबरला इंग्लंड आणि २ नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. अशा परिस्थितीत, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५०वे शतक झळकावण्यासाठी कोहलीला त्याआधी खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांपैकी एकात शतक ठोकावे लागेल, जे त्याचे ४९वे वन डे शतक असेल.

हेही वाचा: IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध सामन्यात अश्विन खेळण्याची शक्यता, रोहित शर्माने काय आखली योजना? जाणून घ्या

सचिनचा विराट कोहली विक्रम मोडेल

जर आपण एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके कोणी झळकावली आहेत हे पाहिले तर, ती भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने केली आहेत. सचिनने एकदिवसीय कारकिर्दीत ४९ शतके झळकावली होती. कोहलीने आतापर्यंत ४८ शतके पूर्ण केली आहेत. अशा परिस्थितीत, ५० शतके पूर्ण केल्यानंतर, तो महान तेंडुलकरचा विक्रम मोडत फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनणार आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत २८६ वन डे सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या २७४ डावांमध्ये त्याने ५८.१६च्या सरासरीने १३४३७ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ४८ शतकांव्यतिरिक्त ६९ अर्धशतकेही केली आहेत. त्या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १८३ धावा आहे.

हेही वाचा: IPL Auction 2024: विश्वचषकादरम्यान BCCIने सुरु केली आयपीएलची तयारी! लिलावासाठी देश आणि तारीख ठरली, जाणून घ्या ठिकाण

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिकला दुखापत झाली होती

१९ ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना हार्दिक चेंडू अडवताना घसरला आणि त्याचा पाय मुरगळला, त्यामुळे तो २२ ऑक्टोबरला धरमशाला येथे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याला मुकला. त्याने दुखापतीवर उपचार घेण्यासाठी सोमवारी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पोहचला होता.

इंग्लंडविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग-११

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन/मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.