Virat Kohli Zindabad Pakistan Video Viral: बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा तब्बल ८ वर्षांनंतर खेळवली जात आहे. यंदा ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होत आहे. तरी भारताचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. १९ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघ पाकिस्तानात खेळणार नसला तरी येथील चाहत्यांमध्ये मात्र भारतीय क्रिकेटपटू आणि त्यातही विराट कोहलीची चांगलीच क्रेझ आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी कराचीतील नॅशनल स्टेडियमबाहेर जमलेल्या चाहत्यांनी कोहली, कोहली… असा जयघोष करत विराट कोहली जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यासंबंधीचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

पाकिस्तानमध्ये बिगर पाकिस्तानी खेळाडूही चांगलेच प्रसिद्ध आहेत. विराट कोहली कधीही पाकिस्तानात खेळलेला नाही. मात्र त्याचा पाकिस्तानात मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्यामुळेच आयपीएलमधील आरसीबी संघही पाकिस्तानात प्रसिद्ध आहे.

भारतीय संघ दुबईला रवाना

दरम्यान, भारतीय संघ १५ फेब्रुवारी रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना झाला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह संघाची पहिली तुकडी मुंबईमधून दुबईसाठी रवाना झाली. भारताचा अ गटात समावेश असून पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडही या गटात आहेत. २० फेब्रुवारी रोजी भारताचा सामना बांगलादेशशी आणि २३ फेब्रुवारी भारत पाकिस्तानशी भिडणार आहे. तर लीगमधील शेवटचा सामना २ मार्च रोजी न्यूझीलंडशी होईल.

उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला तीनपैकी दोन सामने जिंकावे लागणार आहेत. भारत वि. पाकिस्तान हा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात लक्षणीय सामना असणार आहे. याकडे सर्व जगातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलायचे झाल्यास पाकिस्तानने भारताविरोधात आघाडी घेतल्याचे दिसते. त्यांनी आतापर्यंत भारताविरोधात तीन सामने जिंकले आहेत. तर भारताने दोन सामने जिंकले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ असा असेल

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.