Pakistan’s Fab Sachan Makes Virat kohli Sand Art: विराट कोहलीची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. विराट कोहलीची क्रेझ चाहत्यांच्या डोक्यावर बोलते. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहलीचा वाळूवर बनवलेला सुंदर फोटो पाहायला मिळत आहे. पण विराट कोहलीची अप्रतिम सँड आर्ट तयार करणारा कलाकार कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? खरंतर, विराट कोहलीच्या एका पाकिस्तानी चाहत्याने वाळूवर त्याच्या आवडत्या क्रिकेटरचे चित्र रेखाटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ –

विराट कोहलीची अप्रतिम सँड आर्ट बनवणाऱ्या कलाकाराचे नाव सचान आहे. सचान हा पाकिस्तानातील बलुचिस्तानचा रहिवासी आहे. तो विराट कोहलीचा मोठा चाहता आहे. बलुचिस्तानमधील एका रहिवाशाने विराट कोहलीची अप्रतिम सँड आर्ट तयार केली आहे. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.

पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली ठरला फ्लॉप –

मात्र, शनिवारी झालेल्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली स्वस्तात बाद झाला. विराट कोहलीने ७ चेंडूत ४ धावा केल्या. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने विराट कोहलीला आपला बोल्ड केले. दुसरीकडे, या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर पावसामुळे हा सामना अनिर्णित राहिला. अशा प्रकारे दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आले. भारतीय संघ आपला पुढचा सामना नेपाळशी खेळणार आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना ४ सप्टेंबर रोजी पल्लेकेले येथे होणार आहे.

हेही वाचा – IND vs PAK: पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी ट्विट करून भारतीय फलंदाजांची उडवली खिल्ली, जाणून घ्या काय म्हणाले?

सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले. अशा प्रकारे पाकिस्तानचे दोन सामन्यांतून तीन गुण झाले. त्यानी पहिल्याच सामन्यात नेपाळचा पराभव केला होता. दुसरीकडे, भारताच्या खात्यात एका सामन्यातून एक गुण आहे. आता सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात नेपाळला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागेल. सुपर-४ मध्ये पोहोचणारा पाकिस्तान हा पहिला संघ ठरला आहे.

Story img Loader