Virat Kohli Bat Craze in Australia Video Viral : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अजून सुरू झालेली नाही आणि ऑस्ट्रेलियात स्टार भारतीय फलंदाज विराट कोहलीची प्रचंड क्रेझ पाहिला मिळत आहे. ऑस्ट्रेलियात विराट कोहलीच नव्हे, तर त्याच्या बॅटची पण क्रेझ पाहायला मिळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणार आहे. याआधी विराट कोहलीच्या बॅटने ऑस्ट्रेलियन मार्केटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या बॅट किंमत इतकी जास्त आहे की, ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विराट कोहलीच्या बॅटची किंमत किती?
ऑस्ट्रेलियन पॉडकास्टर आणि यूट्यूबर नॉर्मन कोचेनेक यांनी शेअर केलेल्या अलीकडील व्हिडिओमध्ये कोहलीच्या एमआरफ जिनियस ग्रँड किंग बॅटची प्रीमियम किंमत सांगितली आहे. विराटची बॅट ग्रेग चॅपल क्रिकेट सेंटर येथे २९८५ ऑस्ट्रेलियन डॉलर्स (अंदाजे १.६४ लाख रुपये) मध्ये विकले जात आहे. विराट कोहलीचा ऑटोग्राफ असलेले स्टिकर्स असलेली ही बॅट क्रिकेटप्रेमींना आकर्षित करत आहे. ऑस्ट्रेलियन पॉडकास्टरने असेही सांगितले की ही बॅट कस्टमाइज्ड बॅगसह येते.
विराटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा –
प्रथम बांगलादेशविरुद्ध आणि नंतर न्यूझीलंडविरुद्ध फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीकडून टीम इंडिया आणि चाहत्यांना या मालिकेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. गेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये विराट एकही मोठी खेळी साकारु शकलेला नाही. अशा परिस्थितीत पर्थ कसोटीत तो फॉर्मात परतेल, अशी आशा आहे. कारण ऑस्ट्रेलिया विराट कोहलीची बॅट नेहमी आग ओकते. ज्यामुळे त्याचे आकडे उत्कृष्ट आहेत.
हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली मोठा पराक्रम करण्याच्या उंबरठ्यावर! ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार जगातील पहिलाच खेळाडू
u
विराट कोहलीची ऑस्ट्रेलियातील कामगिरी –
विराट कोहलीने २०११ पासून ऑस्ट्रेलियात १३ कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने सहा शतके आणि चार अर्धशतकांच्या मदतीने ५४.०८ च्या सरासरीने १३५२ धावा केल्या आहेत. यामध्ये १६९ धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कोहली पाचव्यांदा ऑस्ट्रेलियाला दौऱ्यावर आहे आणि त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी २०१४-१५ मालिकेतील होती, ज्यामध्ये त्याने चार कसोटी सामन्यांमध्ये ८६.५० च्या सरासरीने चार शतके आणि एक अर्धशतकांसह ६९२ धावा केल्या होत्य. या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीने सहा सामन्यांमध्ये २२.७२ च्या सरासरीने केवळ २५० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ७० धावा ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.