भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या लूक्समुळे फार चर्चेत असतो. लग्नापूर्वी त्याचे विविध हेअस्टाईलचे आणि बिअर्डचे फोटो अनेकांना घायाळ करत होते. आयपीएल २०२१च्या स्थगितीनंतर विराट आपल्या संघासह म्हणजेच टीम इंडियासह इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, या दौऱ्यापूर्वी विराट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ट्विटरवर विराटचा एक नवीन लूक व्हायरल होताना दिसत आहे.

ट्विटरवर लोकांनी दिलेल्या प्रतिसादानुसार आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी विराटने हा नवीन लूक केल्याचे म्हटले जात आहे. येत्या २ जूनला भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी निघणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाचे खेळाडू मुंबईत क्वारंटाईन कालावधीत असून ते  इंग्लंडला पोहोचल्यानंतरही त्यांना ३ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल.

करोनाविरुद्धच्या लढाईसाठी BCCIने दिले २००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर!

इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीने करोनाची लस टोचून घेतली. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लस घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. कृपया लस घ्या, सुरक्षित राहा, असे विराटने सांगितले. विराटव्यतिरिक्त टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आपल्या पत्नीसह करोनाची लस घेतली. त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत करोनायोद्ध्यांचे आभार मानले. याआधी संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनीही करोनाची लस घेतल्याचे सांगितले होते.

लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

 

 

 

साऊदम्पटनमध्ये रंगणार अंतिम लढत

साऊदम्पटन येथे १८ ते २२ जूनदरम्यान भारत-न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत रंगणार आहे. त्यानंतर ४ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येईल. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून मध्यातच माघार घेणारा रवींद्र जडेजा, हनुमा विहारी यांसह अनेक खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. मात्र अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने ही संघनिवड केली. वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना भारतीय संघात स्थान लाभलेले नाही.

‘‘हार्दिक पंड्याऐवजी शार्दूल ठाकूरला ऑलराउंडर म्हणून संघात स्थान मिळायला हवे”