Virat Kohli’s sixes have been included in the promo video : टी-२० विश्वचषकाला फारसा वेळ उरलेला नाही आणि त्यामुळेच त्याची तयारीही जोरात सुरू झाली आहे. आयसीसीने तिकीट विक्रीची घोषणा केली असून उपांत्य फेरीच्या सामन्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. टी-२० विश्वचषक २०२४ च्या तिकिटांची घोषणा करणारा एक प्रोमो देखील जारी करण्यात आला आहे. यामध्ये विराट कोहलीने मेलबर्नमध्ये हरिस रौफविरुद्ध मारलेला षटकार दाखवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक, २०२२ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होता. त्या सामन्यात एके काळी पाकिस्तानी संघ खूपच चांगल्या स्थितीत होता. टीम इंडियाच्या चार विकेट खूप लवकर पडल्या होत्या, पण यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने जबरदस्त भागीदारी करत टीम इंडियाला सामन्यात परत आणले आणि टीम इंडियाला विजयापर्यंत नेले.

विराट कोहलीने हरिस रौफविरुद्ध दोन जबरदस्त षटकार ठोकले होते –

भारतीय संघाला विजयासाठी शेवटच्या दोन षटकात ३१ धावांची गरज होती. अशा स्थितीत १९व्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या हरीस रौफने पहिले चार चेंडू चांगलेच टाकले होते. आता भारताला विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूंवर मोठे शॉट्स हवे होते. अशा स्थितीत विराट कोहलीने दोन जबरदस्त षटकार ठोकले. यातील त्याचा पहिला षटकार खूपच शानदार होता, ज्याचे सर्वांनी कौतुक केले होते. विराट कोहलीच्या या षटकाराची बऱ्याच दिवस चर्चा चालली होती. आता आयसीसीने पुढच्या विश्वचषकाच्या प्रोमोमध्येही त्याचा समावेश केला आहे. ज्याचा व्हिडीओ एक्सवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – IND vs ENG 2nd Test : शुबमन गिलचा फ्लॉप शो सुरूच! सोशल मीडियावर चाहत्यांनी व्यक्त केला संताप

आगामी टी-२० विश्वचषकादरम्यान, भारतीय संघाचे सर्व गट सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होतील. भारत-पाकिस्तान सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. आयसीसीने टी-२० विश्वचषकासाठी तिकीट प्रक्रियाही जाहीर केली आहे. चाहत्यांना १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान तिकिटांसाठी अर्ज करावा लागणार आहे. वेबसाइटवर प्रवेश केल्यानंतर, चाहते सहा तिकिटांसाठी अर्ज करू शकतात.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohlis sixes have been included in the promo video produced by icc for t20 world cup 2024 vbm