मैदानात शांत आणि संयमी खेळीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या राहुल द्रविडचा राग तुम्ही कधी पाहिलाय का?. रागावलेला राहुल द्रविड पाहून विराटलाही असाच आश्चर्याचा धक्का बसला असून राहुलभाईला असं कधी पाहिलं नव्हतं असं ट्वीट विराटने केले आहे.
विराट कोहलीने ट्विटर अकाऊंटवर राहुल द्रविडचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे क्रेडीट कार्डसंबंधीची जाहिरात असून त्यात राहुल द्रविडचा राग कसा आहे हे दाखवण्यात आले आहे. वाहतूक कोंडीमुळे राहुल द्रविडला त्याचा राग अनावर होतो आणि तो बाजूच्या गाडीचालवकावर ओरडतो, बॅटने एका गाडीचा आरसा फोडतो असे दाखवण्यात आले आले. ही जाहिरात पाहून विराटने ट्वीट केले आहे. ‘राहूल भाईचे हे रुप याआधी कधी पाहिले नाही’ असे त्याने व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे. राहुल द्रविडची ही जाहिरात आणि त्यावर विराटने दिलेली प्रतिक्रिया ही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
Never seen this side of Rahul bhai pic.twitter.com/4W93p0Gk7m
— Virat Kohli (@imVkohli) April 9, 2021
दरम्यान, क्रिकेटच्या मैदानात आजपासून आयपीएल रंगणार आहे. भारतातील सहा शहरांमध्ये ९ एप्रिल ते ३० मेदरम्यान रंगणाऱ्या आयपीएल स्पर्धेत यंदाही आठ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेपूर्वीच काही खेळाडू तसेच कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्यामुळे आयोजनावर अनेकांनी प्रश्नचिन्हही उपस्थित केले. परंतु ‘आयपीएल’ नियोजनानुसारच खेळवण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले.