Virat Kohli dance video: प्रथम यशस्वी जैस्वालने शतक झळकावले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मानेही शतक पूर्ण केले. यानंतर विराट कोहलीने अर्धशतकी खेळी खेळली. भारतीय चाहत्यांना आणखी एका शतकाची अपेक्षा होती पण ते होऊ शकले नाही. गेल्या ७ वर्षांपासून वेस्ट इंडिजमध्ये शतकाची वाट पाहणाऱ्या विराट कोहलीची पुन्हा निराशा झाली. डॉमिनिका कसोटीत कोहलीने बराच काळ मेहनत घेतली पण त्याचे फळ त्याला मिळाले नाही. शतक नाही, पण कोहलीने आपल्या डान्सने चाहत्यांचे मनोरंजन नक्कीच केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकला. १७१ धावांची शानदार खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला सामनावीराचा किताब देण्यात आला. जैस्वालने १७१ धावा केल्या आणि रोहितने १०३ धावांची खेळी केली. याशिवाय विराट कोहली ७६ धावा करून बाद झाला. जरी कोहलीने शतक झळकावण्याची संधी गमावली असली तरी भारताच्या माजी कर्णधाराने मैदानावर आपल्या डान्सने चाहत्यांची मने नक्कीच जिंकली. तसे, कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी, या कसोटी सामन्यात शतक झळकावून कोहली कारकिर्दीतील २९वे शतक झळकावेल, असा अंदाज बांधला जात होता. पण हे होऊ शकले नाही. ७६ धावांची इनिंग खेळून कोहली बाद झाला.
कोहलीचा सामन्यादरम्यान डान्सचा व्हिडीओ व्हायरल
विराट कोहली आपले शतक पूर्ण करू शकला नाही पण त्याने चाहत्यांचे अन्य मार्गाने मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या सत्रात ४२१ धावांवर डाव घोषित केला. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी जेव्हा टीम इंडिया मैदानावर उतरली तेव्हा कोहलीने संधी साधत काही वेळ मैदानावर डान्स करत घालवला. शतक हुकल्याची निराशा कोहलीच्या चेहऱ्यावरून दिसत नव्हती आणि तो आपल्या नृत्यात मग्न दिसत होता. कोहलीच्या डान्सचा हा व्हिडीओ चाहत्यांनाही आवडला.
विराटला दोन वेळा मिळाली संधी
भारताच्या माजी कर्णधाराने पहिल्या सत्रातच आपले अर्धशतक पूर्ण केले होते परंतु दुसऱ्या सत्रात त्याचे शतकात रूपांतर करण्यात तो अपयशी ठरला. पहिल्या सत्रात कोहली केवळ ४० धावांवर असताना विंडीजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने त्याच्या कव्हर्समध्ये एक सोपा झेल सोडला. काही वेळाने कोहलीने आपले २९वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले.
कोहलीने पहिल्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात ३६ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत ७२ धावा करून नाबाद होता. दुसऱ्या सत्रात जेव्हा तो डाव पुढे नेण्यासाठी उतरला तेव्हा २०१६ नंतर प्रथमच कॅरेबियन भूमीवर शतक झळकावणार असे वाटत होते. मात्र, दुसऱ्या सत्रातील पहिल्याच षटकातच वेस्ट इंडिजला संधी मिळाली. वेगवान गोलंदाज केमार रोचच्या पाचव्या चेंडूवर यष्टिरक्षक जोशुआ डासिल्वाने त्याचा झेल सोडला. यावेळी नशीब कोहलीवर मेहरबान आहे आणि शतक निश्चित होईल, असे वाटत असतानाच त्याने आपली विकेट गमावली. दुसऱ्या दिवशी छातीत दुखू लागल्याने मैदानाबाहेर गेलेला फिरकी गोलंदाज रहकीम कॉर्नवॉलने त्याच्या दुसऱ्याच षटकात त्याला लेग स्लिपमध्ये झेलबाद केले.