Imran Khan On Virat Vs Babar: १९९२ मध्ये पाकिस्तानला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार इम्रान खानने विराट कोहली आणि सध्याचा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. बाबर आझम विराट कोहलीला मागे टाकू शकतो, असा विश्वास इम्रान खानला आहे. भारत आणि पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेहमीच मोठी स्पर्धा होत आली आहे.

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू इम्रान खानने त्याचवेळी बाबर आझमची तुलना भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत केली जाते. मात्र, दोन्ही खेळाडूंमध्ये खूप फरक आहे. बाबर आझमपेक्षा विराट कोहली खूप सीनियर आहे. बाबर आझमची कोहलीशी तुलना करणे कितपत योग्य आहे? हा वेगळा प्रश्न आहे.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप

हेही वाचा: Rohit Sharma: रोहितला कर्णधार व्हायचेच नव्हते? WTCच्या पराभवानंतर चर्चेला उधाण, काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

दुसरीकडे, इम्रान खान त्या दोघांच्या तुलनेवर बोलताना तो म्हणाला, “मी अलीकडे क्रिकेट पाहिलेले नाही, पण माझा विश्वास आहे की विराट कोहली आणि बाबर आझम एकाच श्रेणीतील उत्कृष्ट फलंदाज आहेत. बाबर आझम विराट कोहलीला सहज पराभूत करू शकतो. तो त्याचे सगळे विक्रम भविष्यात मोडू शकतो. मी जे पाहिले आहे त्यावरून तो तांत्रिकदृष्ट्या खूप चांगला फलंदाज आहे.”

आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत भारत-पाक सामना पाहायला मिळणार आहे

या वर्षी खेळल्या जाणाऱ्या आशिया चषक २०२३ आणि एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामने पाहायला मिळणार आहेत. मात्र, दोन्ही स्पर्धांचे अधिकृत वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, १५ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय विश्वचषक सामना खेळवला जाणार आहे.

हेही वाचा: Babar Azam Record: बाबर आझमचा कसोटी क्रिकेटमध्ये नवीन विक्रम! विराट-स्मिथसहित सचिनलाही टाकले मागे, जाणून घ्या

विराट आणि बाबरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आतापर्यंत अशीच होती

विराट कोहलीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर बाबर आझमने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विराट कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत ४९८ सामने खेळले आहेत. तर बाबर आझमने २५१ सामने खेळले आहेत. कोहलीने ५५७ डावांमध्ये ५३.४४च्या सरासरीने २५३८५ धावा केल्या आहेत, तर बाबर आझमने २८१ डावांमध्ये ४९.८७च्या सरासरीने १२२७० धावा केल्या आहेत. कोहलीच्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७५ शतके झळकावली आहेत. तर बाबर आझमने ३० शतके झळकावली आहेत.