भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा आपल्या कारकिर्दीत स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जायचा. सुरुवातीच्या षटकात गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून त्याची ख्याती होती. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, विंडीज यासारख्या संघाच्या वेगवान गोलंदाजांना त्याने चोपून काढले होते. निवृत्तीनंतर त्याच्या फलंदाजीला काहीसा विराम मिळाला, पण त्याची शाब्दिक फटकेबाजी अजूनही सुरु असते. सेहवाग आपल्या कल्पक ट्विटच्या माध्यमातून कायम चर्चेत असतो.

सेहवागने आजदेखील असेच एक मजेशीर ट्विट केले आहे. सुरेश रैना याची फलंदाजी जेव्हा सुरु असते, तेव्हा त्याच्या फटकेबाजीकडे पाहून सेहवागला ‘रैना बिती जाए, शाम न आए’ हे गाणं आठवतं असं त्याने म्हटलं आहे. याबरोरबच रैनाचा वाद्य वाजवतानाचा फोटो ट्विट करत त्याने रैनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

याशिवाय, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही रैनाला शुभेच्छा दिल्या आहेत.

माजी फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण यानेही रैनाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

चेन्नई सुपर किंग्ज संघानेही त्याला ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader