Virender Sehwag Double Century Against WI : वीरेंद्र सेहवागची गणना जगातील सर्वात दमदार सलामीवीरांमध्ये केली जाते. तो केवळ एकदिवसीयच नाही तर कसोटी क्रिकेटमध्येही टी-२० फॉरमॅटप्रमाणे फलंदाजी करत असे. सेहवागने आपल्या कारकिर्दीत टीम इंडियासाठी अनेक वादळी इनिंग खेळल्या. मुलतानमध्ये पाकिस्तानविरुद्धची ३०९ धावांची खेळी कोणीही विसरू शकणार नाही. या खेळीमुळे सेहवागला ‘मुलतानचा सुलतान’ म्हटले जाऊ लागले. मात्र १२ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी त्याने द्विशतक झळकावण्याचा विक्रम केला होता. सचिननंतर हा पराक्रम करणारा दुसरा खेळाडू ठरला होता.

८ डिसेंबर हा दिवस वीरेंद्र सेहवागसाठी खूप खास आहे. १२ वर्षांपूर्वी याच दिवशी सेहवागने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर इतिहास रचला होता. सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात २१९ धावा केल्या होत्या. त्यावेळी सेहवाग कर्णधार म्हणून वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. त्यानंतर ६ वर्षांनी भारताच्या रोहित शर्मानेही ही कामगिरी केली. तो द्विशतक झळकावणारा भारतचा तिसरा खेळाडू ठरला. त्याने २०८ नाबाद धावा केल्या होत्या. रोहितने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध हा विक्रम केला होता.

West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ

आजपासून बरोबर १२ वर्षांपूर्वी म्हणजे ८ डिसेंबर २०११ रोजी वीरेंद्र सेहवागने तुफानी इनिंग खेळली होती. वीरेंद्र सेहवागने अवघ्या १४१ चेंडूत २१९ धावा केल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत २३ चौकार आणि ७ षटकार मारले होते. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने ५० षटकांत ५ बाद ४१८ धावा केल्या. वीरेंद्र सेहवागने वनडे कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. त्यावेळी वीरेंद्र सेहवाग वनडे फॉरमॅटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा दुसरा फलंदाज होता. कारण हा पराक्रम करणारा पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर आहे.

हेही वाचा – AUS vs PAK Test Series: मिचेल जॉन्सनच्या टीकेला डेव्हिड वॉर्नरचे प्रत्युत्तर; म्हणाला, “माझ्या आई-वडिलांनी मला…”

टीम इंडियाने उभारला होता ४१८ धावांचा मोठा डोंगर –

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर वीरेंद्र सेहवागच्या द्विशतकाशिवाय गौतम गंभीर आणि सुरेश रैनाने पन्नास धावांचा टप्पा पार केला. गौतम गंभीरने ६७ चेंडूत ६७ धावा केल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार मारले. तर सुरेश रैनाने ४४ चेंडूत ५५ धावा केल्या. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने अनुक्रमे २७ आणि २३ धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसाठी हा सामना चांगला नव्हता. वेस्ट इंडिजचे गोलंदाज चांगलेच महागडे ठरले होते. वेस्ट इंडिजकडून केमार रोचशिवाय आंद्रे रसेल आणि किरॉन पोलार्ड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली होती.

हेही वाचा – LLC 2023 : गौतम गंभीरवर टीका करणे श्रीसंतला पडले महागात, एलएलसी आयुक्तांनी बजावली कायदेशीर नोटीस

भारताच्या ४१८ धावांना प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजचा डाव ४९.२ षटकांत २६५ धावांवर आटोपला. अशा प्रकारे भारतीय संघाने १५३ धावांनी मोठा विजय नोंदवला. या सामन्यात विंडीजकडून यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदिनने ९६ चेंडूत सर्वाधिक ९६ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत १२ चौकार मारले. पण याशिवाय एकाही कॅरेबियन फलंदाजाला पन्नास धावांचा आकडा पार करता आला नाही. त्याचवेळी भारताकडून रवींद्र जडेजा आणि राहुल शर्मा यांनी सर्वाधिक ३-३ विकेट्स घेतल्या. याशिवाय सुरेश रैनाने २ विकेट्स घेतल्या, तर रवी अश्विनला १ विकेट मिळाली.