Virender Sehwag’s Reaction to Foreign Coaches: भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग असे मानतो की परदेशी प्रशिक्षकही खेळाडूंशी भेदभाव करू शकतात, असा आरोप भारतीय प्रशिक्षकांवर अनेकदा केला जातो. त्यासाठी त्यांनी ग्रेग चॅपलचे उदाहरण देत माजी कांगारू खेळाडूवर मोठा आरोप केला. तो म्हणाला की, चॅपेलने त्याला कर्णधार बनवण्याचे आश्वासन दिले होते, पण त्याला दोन महिन्यांनी राष्ट्रीय संघातून वगळण्यात आले. सेहवाग म्हणाला की, जेव्हा तो भारतीय संघात खेळायचा, तेव्हा तो वरिष्ठांना विचारायचा की कोणीही भारतीय प्रशिक्षक का होऊ शकत नाही. त्याला उत्तर मिळाले होते, की पूर्वग्रह हे एक मोठे कारण आहे.
स्पोर्ट्स नेक्स्ट मुलाखतीत वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “त्या सीनियर्सनी भारतीय प्रशिक्षकांसोबत बराच वेळ घालवला होता आणि त्यांना वाटत होत की त्यांना काही खेळाडू आवडतात आणि त्यांची वृत्ती बर्यापैकी पक्षपाती असायची. जो आवडत नाही, त्याचे काय खरे नसायचे. त्यांचा असा विश्वास होता की परदेशी प्रशिक्षक आला तर त्यामुळे तो सर्व खेळाडूंशी त्याच्या मनाप्रमाणे वागेल, पण प्रत्यक्षात हे खरे नाही. कारण परदेशी प्रशिक्षकांचेही आवडते खेळाडू असतात.”
ग्रेग चॅपलबद्दल काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?
वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला, “विदेशी प्रशिक्षकही नावे पाहता. मग ते तेंडुलकर असो, द्रविड, गांगुली किंवा लक्ष्मण. ग्रेग चॅपल आल्यावर सेहवागच कर्णधार असेल असे पहिले विधान त्यांनी केले. दोन महिन्यांत कर्णधारपद तर विसरा, मी संघातून बाहेर झालो.” त्यानंतर ते म्हणाले की भारतीय संघ त्या स्थितीत नाही, जिथे त्यांना प्रशिक्षणाची गरज होती, उलट चांगले व्यवस्थापन हवे होते.
गॅरी कर्स्टन यांना सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून घोषित केले
सेहवाग म्हणाला की ज्या प्रशिक्षकांचे खेळाडूंशी चांगले संबंध असतात त्यांना त्यांच्या वैयक्तिक गरजा माहित असतात आणि ते अधिक यशस्वी होतात. त्यानंतर त्याने गॅरी कर्स्टनचे उदाहरण दिले. तो म्हणाला, “गॅरी कर्स्टन हे सर्वोत्तम प्रशिक्षक होते, जे मला ५० चेंडू खेळायला सांगायचे आणि नंतर घरी किंवा हॉटेलवर जायला सांगायचे. राहुल द्रविड २०० चेंडू खेळेल, तेंडुलकर ३०० आणि गंभीर ४०० चेंडू खेळेल. प्रत्येक खेळाडूला किती सराव करणे आवश्यक आहे हे त्यांना माहीत होते.”