भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक गोलंदाजांचे तोंडचे पाणी पळवले. सलामी फलंदाज म्हणून सेहवागने अनेक विक्रम पादाक्रांत केले. त्याचा सलामी जोडीदार सचिन तेंडुलकरलच्या फलंदाजीची नक्कल करण्याचा प्रयत्नही केल्याचे सेहवागने सांगितले. १९९२च्या वर्ल्डकप स्पर्धेत सचिनला पाहिल्यानंतर मी क्रिकेट खेळायला लागलो, असे सेहवागने सांगितले.

क्रिकगुरू या अॅपच्या लाँचिंगवेळी सेहवागने आपली प्रतिक्रिया दिली. भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर हे अॅपचे सह-संस्थापक आहेत. सेहवाग म्हणाला, ” १९९२च्या वर्ल्डकर स्पर्धेत मी सचिनला पाहिले. त्याचा स्ट्रेट ड्राईव्ह, बॅकफुट पंच या गोष्टी मी अनुसरल्या. आजकालच्या क्रिकेटपटूंकडे त्यांच्या आवडीच्या म्हणजे एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, ब्रायन लारा किंवा वीरेंद्र सेहवाग या क्रिकेटपटूंचे व्हिडिओ आहेत. पण त्या काळी तसे काही नव्हते.”

हेही वाचा – ‘‘IPLमुळे इंग्लंडचे खेळाडू आपले तळवे चाटतात, मला त्यांचे रंग माहीत आहेत”

”सुविधा असत्या, तर लवकर झाले असते आंतरराष्ट्रीय पदार्पण”

सेहवाग म्हणाला, ”एखाद्याशी ऑनलाइन बोलणे किंवा व्हिडिओ सबस्क्राइब करून शिकणे, अशा गोष्टी तेव्हा नव्हत्या. जर तसे असते तर मी नक्कीच हे केले असते आणि अधिक चांगले शिकलो असतो आणि कमी वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले असते.

खेळपट्टीवर सेहवागचा पाय फारसा हलत नव्हता आणि या समस्येबद्दल बर्‍याच दिग्गज खेळाडूंनी त्याला  मदत केली. मन्सूर अली खान पतौडी, सुनील गावसकर आणि श्रीकांत यांच्या सल्ल्यामुळे त्याला खेळ सुधारण्यास मदत झाली. सेहवाग म्हणाला, ”प्रत्येकजण मला हे सांगायचा, की फटका खेळताना मला माझ्या पायांचा वापर नीट करायला हवा, पण माझे पाय कुठे असायला हवे, हे कोणी सांगितले नाही. पण मन्सूर अली खान पटौदी, सुनील गावसकर आणि के श्रीकांत यांनी मला मधल्या यष्टीसमोर उभे राहण्याचा सल्ला दिला.”

Story img Loader