Virender Sehwag on David Warner Retirement: जगभरात असे काही फलंदाज आहेत ज्यांनी कसोटी क्रिकेट असे खेळले की जणू ते वन डे आणि टी-२० खेळत आहेत. जेव्हा जेव्हा आपण आक्रमक कसोटी सलामीवीरांबद्दल बोलतो तेव्हा सर्वात पहिले नाव लक्षात येते ते म्हणजे भारताचा वीरेंद्र सेहवाग आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर. डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीबद्दल क्रिकबझशी बोलताना सेहवागने वॉर्नरच्या त्याच्या आवडत्या खेळीच्या आठवणी सांगितल्या. सेहवागने वॉर्नरची सर्वोत्तम कसोटी खेळी निवडली आहे. कोणती आहे ती, ते आपण जाणून घेऊया.

डेव्हिड वॉर्नरने २०११मध्ये भारताविरुद्ध पर्थ येथे झालेल्या कसोटी सामन्यात १८० धावांची इनिंग खेळली होती. या काळात त्याने केवळ १५९ चेंडूंचा सामना केला. वॉर्नरच्या खेळीत २० चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता आणि त्याने या सामन्यात भारतीय गोलंदाजांची चांगलीच फटकेबाजी केली. भारताने हा सामना एक डाव आणि ३७ धावांनी गमावला कारण, टीम इंडिया पहिल्या डावात १६१ आणि दुसऱ्या डावात १७१ धावांवर बाद झाली.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया

हेही वाचा: IND vs SA 2nd Test: मोहम्मद सिराजने रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेत कमी धावांत सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “डेव्हिड वॉर्नरने २०११मध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनच्या पर्थ येथील वाका खेळपट्टीवर आमच्याविरुद्ध १८० धावा केल्या होत्या. वाकाच्या खेळपट्टीवर केलेले शतक ही माझी आवडती वॉर्नरची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने चहाच्या विश्रांतीपर्यंत शतक झळकावले होते. वॉर्नरने तोपर्यंत एकहाती सामना संपवला होता.” पुढे सेहवाग म्हणाला, “कसोटी फलंदाज डेव्हिड वॉर्नरची खेळी इतक्या लवकर आणि इतक्या कमी वेळात संपली की त्याने ऑस्ट्रेलियाचा एक वेगळा अंदाज दाखवला. त्याला कसोटी सामना लवकर संपवायचा होता का, त्याच्या या आक्रमक खेळीवरुन दिसून येत होते. वॉर्नरने त्याच्या कसोटी कारकिर्दीत जर काही मिळवले असेल तर त्याचा फलंदाजीतील आक्रमक अंदाज हा आहे. त्याने जे साध्य केले ते खूप खास आहे.”

ऑस्ट्रेलियाला दोनदा विश्वविजेते बनवण्यात महत्त्वाची भूमिका

वॉर्नर हा दोन वेळा विश्वचषक विजेता देखील आहे. त्यांनी २०१५ मध्ये घरच्या मैदानावर आणि २०२३ मध्ये पुन्हा भारतात विजेतेपद पटकावले. त्याने २०१५ विश्वचषकाच्या आठ डावात ४९.२८च्या सरासरीने आणि १२०.२०च्या स्ट्राईक रेटने ३४५ धावा केल्या. त्याने शतक झळकावले होते. तो या स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. २०२३च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने ११ सामन्यांमध्ये ४८.६३च्या सरासरीने आणि १०८.२९च्या स्ट्राइक रेटने ५३५ धावा केल्या. तो या स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने विश्वचषकात दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली होती.

हेही वाचा: AUS vs PAK 3rd Test: रिझवान- आमिर जमालची शानदार अर्धशतके, पाकिस्तान पहिल्या डावात ३१३ धावांवर सर्वबाद

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान तिसऱ्या कसोटीत काय झाले?

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी (३ जानेवारी) सिडनी येथे सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात ३१३ धावांत सर्वबाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने बिनबाद ६/० धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर ६ धावा करून नाबाद आहे. उस्मान ख्वाजाने अजून खातेही उघडलेले नाही. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात ३०७ धावांनी मागे आहे.

Story img Loader