Virender Sehwag Predicted that Rohit Sharma will score the most runs: एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू होण्यासाठी ५० दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. भारतात होणाऱ्या या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून ती १९ नोव्हेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. याआधी टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने मोठी भविष्यवाणी केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल, असे त्याने म्हटले आहे. २०१९ मध्येही रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने ९ सामन्यात ६४८ धावा केल्या होत्या.

विश्वचषकात टीम इंडियाला ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. तत्पूर्वी, सेहवाग म्हणाला की, भारतातील फलंदाजीला अनुकूल असलेल्या परिस्थितीमुळे पुढील एकदिवसीय विश्वचषकादरम्यान सलामीवीरांना चमकण्याची संधी मिळेल. आयसीसीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये सेहवागला विचारण्यात आले होते की, २०२३ च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा कोण करणार?

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Gautam Gambhir has challenged Australia ahead Border-Gavaskar Trophy
Gautam Gambhir : ‘कोणत्याही प्रकारची खेळपट्टी तयार करा, आम्ही…’, गौतम गंभीरने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाला दिले आव्हान

वीरेंद्र सेहवागने केली रोहित शर्माची निवड –

वीरेंद्र सेहवागने रोहित शर्माची निवड केली आणि म्हणाला, “भारताकडे चांगल्या खेळपट्टी आहेत, त्यामुळे मला वाटते की सलामीवीर फलंदाजांना चांगली संधी मिळेल. जर मला एकाची निवड करायची असेल, तर मी रोहित शर्माचे नाव घेईन. इतर नावे आहेत, पण मी भारतीय आहे आणि मी भारतीय निवडले पाहिजे. त्यामुळे रोहित शर्मा.

रोहित शर्माबद्दल काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?

सेहवागने भारतीय सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले. त्याने सांगितले की, विश्वचषक अनेकदा तो सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसला आहे. तो म्हणाला, “जेव्हा विश्वचषक येतो, तेव्हा त्यांची ऊर्जा पातळी, कामगिरी उंचावते. त्यामुळे तो चांगली कामगिरी करेल, याची मला खात्री आहे. यावेळी तो कर्णधारही आहे. मला खात्री आहे की, तो बदल घडवून आणेल आणि भरपूर धावा करेल.”

हेही वाचा – World Cup 2023: “त्याची आकडेवारी खूपच वाईट…”, आकाश चोप्राने सांगितला विश्वचषकचा कमकुवत दुवा

रोहित शर्माने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत केल्या होत्या सर्वाधिक धावा –

२०१९ एकदिवसीय विश्वचषक इंग्लंडमध्ये खेळला गेला होता, ज्यामध्ये रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या होत्या. ९ सामन्यांत त्याने ८१ च्या सरासरीने ६४८ धावा केल्या, ज्यात पाच शतकांचा समावेश होता. रोहित शर्माने २४४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४८. ६९ च्या सरासरीने ९८३७ धावा केल्या आहेत. ज्यात ३० शतके आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे. यावर्षी रोहितने सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. रोहितने यावर्षी खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये १६ सामन्यांमध्ये ४८.५७ च्या सरासरीने ९२३ धावा केल्या आहेत.