Virender Sehwag on Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामी जोडीमध्ये गणना केली जाते. दोघांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. विस्फोटक आणि निर्भयपणे फलंदाजी करण्यासाठी वीरू ओळखला जात होता. फलंदाजी करताना तो अनेकदा गाणी गुणगुणत असे. यामुळे मैदानावरच सचिनच्या बॅटने त्याने मार खाल्ला होता. याचा खुलासा खुद्द वीरूने केला आहे.
वीरेंद्र सेहवाग सांगितले की, हे प्रकरण २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाचे आहे, जो टीम इंडियाने जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गट सामन्यात हा प्रकार घडला होता. त्या स्पर्धेत टीम इंडियाचा हा एकमेव सामना होता. त्या सामन्यात सचिनने सेहवागला भर सामन्यात बॅटने मारले होते.
द रणवीर शोमध्ये याचा खुलासा करताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “प्रत्येकाची रिलॅक्स होण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची पद्धत वेगळी असते. आपल्याला ते शोधावे लागते. सचिन तेंडुलकरला कदाचित गाताना फलंदाजीही करता येत नाही. त्यांना बोलायला खूप आवडायचं. एकदा २०११ च्या विश्वचषकात आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत होतो. मी खूप चांगल्या मूडमध्ये होतो, गाणे म्हणत होतो आणि धावा येत होत्या. आम्ही ५ षटकात ५०-६० धावा केल्या होत्या. आम्ही ओव्हर्स संपल्यावर भेटायचो, तेव्हा हातमोजेवर हातमोजे मारत ‘चल जाता हूं’ हे गाणं गुणगुणत माघारी जायचो.”
हेही वाचा – IPL 203: नाव न घेता गौतमचे राहुलच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; म्हणाला, “त्यांना फक्त…”
तेंडुलकरने सेहवागला का मारले बॅट –
सेहवाग पुढे म्हणाला, “षटक संपल्यानंतर सचिन तेंडुलकरला बोलायचे होते. त्यांनी एक षटक, दोन षटकांची वाट पाहिली. तिसऱ्या षटकानंतर त्यांना मला बॅटने मारले. मी चकीत झालो. ते म्हणाले, “माझ्याशी बोल!” मी त्यांना म्हणालो, मी चांगल्या मूडमध्ये आहे, गाणी गुणगुणत आहेत, चौकार येत आहेत! मला बोलायचे नाही तुम्ही फक्त शाब्बास-शाब्बास असे म्हणत रहा! त्यांना बोलायला आवडायचं.”
हेही वाचा – IPL 203: नाव न घेता गौतमचे राहुलच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; म्हणाला, “त्यांना फक्त…”
वीरेंद्र सेहवागने सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटबद्दलच्या आकलन शक्तीबद्दल बोलताना सांगितले की त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. तो म्हणाला, “त्यांच्या क्रिकेटच्या आकलनाविषयी बोलायचे, तर ते म्हणायचे, आता गोलंदाज फुल चेंडू टाकून पॅडला मारेल. मी म्हणायचो अहो, काय बोलताय? पुढचा चेंडू त्यांनी सांगितल्याप्रमाणे सरळ आला. सुदैवाने माझी बॅट मध्ये आली. गोलंदाज काय विचार करत होता, हे त्यांना माहीत होते. ते म्हणायचे मी सेहवागला गोलंदाजी करत असेल तर मी काय करेन असा ते विचार करायचे. ते म्हणायचे पुढचा चेंडू बाउंसर येणार हे ध्यानात ठेव. त्याचे क्रिकेटचे ज्ञान इतर कोणापेक्षाही जास्त आहे.”