सलामीचा फलंदाज या व्याख्येला नवा आयाम देणाऱ्या व जगभरातल्या गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणाऱ्या वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले. समाजमाध्यमांवरील अतिउत्साही नेटिझनांमुळे सेहवागच्या निवृत्तीची वार्ता सैरावरा पसरली. मात्र आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेली नाही. भारतात परतल्यावर योग्य वेळी औपचारिक घोषणा करू, असे सेहवागने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या मास्टर्स चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेत सेहवाग खेळणार आहे. मात्र या स्पर्धेत सहभागासाठी खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणे अनिवार्य असते. या लीगमध्ये खेळणार का? या प्रश्नाचे सेहवागने ‘हो’ असे उत्तर दिले आणि त्यातूनच निवृत्तीचा संभ्रम बळावला. मंगळवारी वाढदिवस असणाऱ्या सेहवागने मास्टर्स चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे दुबईत अनावरण केले. त्यावेळी तो बोलत होता. यावेळी ब्रायन लारा, ग्रॅमी स्मिथ, अझर मेहमूद हे खेळाडू उपस्थित होते.
दरम्यान, रणजी क्रिकेट स्पर्धेत सेहवाग हरयाणा संघाचे नेतृत्व करत असून, पुण्याविरुद्धच्या लढतीत तो खेळला होता. २१ ऑक्टोबरला सेहवाग म्हैसूर येथे रणजी लढतीसाठी दाखल होणार असून, उर्वरित हंगामात खेळणार असल्याचे हरयाणा क्रिकेट संघटनेचे सचिव अनिरुद्ध चौधरी यांनी सांगितले.

कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे त्रिशतक झळकावणारा एकमेव फलंदाज असलेल्या सेहवागच्या नावावर एकदिवसीय सामन्यात दोन द्विशतके झळकावण्याचा अनोखा विक्रमही आहे. सेहवागने १०४ कसोटी, २५१ एकदिवसीय आणि १९ ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले असून, १७ हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. २००७मधील ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि २०११च्या एकदिवसीय विश्वचषक अशा दोन विश्वचषक विजेत्या संघाचा सेहवाग अविभाज्य घटक होता.