भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची ओळख बिनधास्त, बेधडक खेळाडू असल्याचे सर्वश्रृत आहे. त्याने कधीच दबावाखाली फलंदाजी केली नाही. सामन्याच्या उत्कंठावर्धक क्षणी कोणताही दबाव निर्माण न होऊ देता प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवताना आपण सेहवागला अनेकदा पाहिलं आहे. मुक्तहस्ते विस्फोटक फटकेबाजी ही त्याची ओळख आजही कायम आहे. पण, यावेळी त्याच्या बिनधास्त फलंदाजीचा एक वेगळा अंदाज अमेरिकेत झालेल्या ‘क्रिकेट ऑल स्टार’ या माजी क्रिकेटवीरांच्या मालिकेतील तिसऱया सामन्यात पाहायला मिळाला. फलंदाजी करतेवेळी सेहवाग चक्क बॉलीवूडचं गाणं गुणगुणत होता. सामन्याच्या तिसऱया षटकात द.आफ्रिकेचे माजी गोलंदाज ऍलन डोनाल्ड यांच्या गोलंदाजीवर सेहवाग ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या हिंदी चित्रपटातील ‘तू जाने ना’ हे गाणे गुणगुणत होता. विशेष म्हणजे, गाणं गात त्याने खणखणीत षटकार देखील खेचला. सेहवागच्या या बिनधास्त शैलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या भरपूर व्हायरल होत असून त्यावर सेहवागचे चाहते भरभरून व्यक्त देखील होत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2015 रोजी प्रकाशित
व्हिडिओ: सेहवाग, ‘तू जाने ना’ गाणं आणि उत्तुंग षटकार..
भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची ओळख बिनधास्त, बेधडक खेळाडू असल्याचे सर्वश्रृत आहे.
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 17-11-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag hums tu jane na before hitting a six to allan donald