India vs Australia, Virender Sehwag: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामना २७ सप्टेंबर रोजी राजकोट येथे होणार आहे. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यातही विजय मिळवत कांगारूंना व्हाईटवॉश देण्याचा भारतीय संघाचा इरादा आहे. तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यासमोर प्लेईंग-११ निवडण्याची खूप मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंदोरमध्ये शतक झळकावणारा शुबमन गिल तिसरा सामना खेळणार नाही. गिलबरोबरच शार्दुल ठाकूरलाही तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली असून दोन्ही खेळाडू आपापल्या घरी गेले आहेत. याशिवाय अक्षर पटेलही वेळेत तंदुरुस्त होऊ शकलेला नाही. त्याच्याऐवजी अश्विनला संधी दिली जाईल. अशा परिस्थितीत अक्षर विश्वचषक खेळण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
Chandrasekhar Bawankule, Chandrasekhar Bawankule ,
महाविकास आघाडीचा जाहीरनामा केवळ घोषणा, बावनकुळेंची टीका
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”

टीम इंडियाने सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाला ४०० धावांचे आव्हान दिले होते. ही धावसंख्या उभारताना यावेळी श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांनी खणखणीत शतके झळकावलीत. दुसरीकडे, के.एल. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनीही विस्फोटक खेळी केली. या खेळाडूंच्या विजयामुळे भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. त्याने शुबमन, श्रेयसपासून सूर्यापर्यंत सर्वांचे कौतुक केले आहे.

भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ९९ धावांनी पराभव केला. या सामन्यात सलामीवीर शुबमन गिलने ९७ चेंडूत १०४ धावा केल्या. ज्यात त्याने ६ चौकार आणि ४ षटकारही मारले. गिलच्या या खेळीवर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग नाराज झाला आहे. क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला, “गेल्या वेळी तो चुकला होता, पण आज त्याने शतक झळकावत याची खात्री तो फॉर्ममध्ये आहे. मी अजूनही म्हणेन की तो ज्या फॉर्ममध्ये त्याने १६०, १८० किंवा २०० धावा केल्या पाहिजेत. खराब फटका मारून बाद होणे मला नाही आवडले.”

हेही वाचा: IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयानंतर के.एल. राहुलचे सूचक विधान; म्हणाला, “प्लेईंग-११ निवडणे रोहित-द्रविडसाठी…”

टीम इंडियाच्या या कामगिरीवर वीरेंद्र सेहवाग खूप खुश झाला. त्याने ट्वीट करत लिहिले की, “डोकं एक, डोकेदुखी अनेक. विश्वचषकापूर्वी भारताला प्लेईंग-११ निवडण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागणार आहे. योग्यवेळी योग्य खेळाडूची निवड केली तर भारतीय संघाला हरवणे कठीण होईल. विजयानंतर सर्वजण पार्टीत सहभागी होतायेत, त्यामुळे ड्रेसिंगरूममध्ये असणारे वातारण खूप चांगले आहे.” त्याचे हे ट्वीट वन डे विश्वचषक २०२३ संदर्भात केले आहे.

सेहवाग पुढे म्हणाला, “तो फक्त २५ वर्षांचा आहे, जरी आज त्याने २०० धावा केल्या असत्या तरी तो थकला नसता आणि क्षेत्ररक्षणही करू शकला असता. वयाच्या ३०व्या वर्षी, हे कठीण दिसते कारण आपण त्यातून बरे होऊ शकत नाही. म्हणूनच आता मोठ्या धावा करणे त्याच्यासाठी चांगले आहे.” ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुबमन गिलचे शतक हुकले. या सामन्यात त्याने ७४ धावा केल्या होत्या. इंदोर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याचे शतक पूर्ण करण्यात त्याला यश आले. या डावात तो चांगला खेळत होता, पण कॅमेरून ग्रीनच्या चेंडूवर खराब शॉट खेळून तो बाद झाला.

हेही वाचा: IND vs AUS: डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरला राईट हॅण्ड बॅटिंग करणं पडलं महागात, अश्विनने दिला धोबीपछाड; पाहा Video

वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये असाल आणि धावा करत असाल तेव्हा तुम्ही तुमची विकेट फेकू नका. तो (शुबमन) बाद झाला तेव्हा १८ षटके बाकी होती. त्याने आणखी ९-१० षटके खेळली असती तर त्याला आपले द्विशतक पूर्ण करता आले असते. रोहित शर्माने तीन द्विशतके झळकावली, आज त्याला संधी होती. या मैदानावर एका खेळाडूने २०० धावा केल्या आहेत, ज्याचे नाव सेहवाग आहे, कारण तो अशाच ट्रॅकवर होता.”