वीरेंद्र सेहवागची गणना जगातील सर्वात स्फोटक फलंदाजांमध्ये केली जाते. कसोटी क्रिकेटमध्येही तो टी-२० सारखे क्रिकेट खेळायचा आणि गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायचा नेहमीच प्रयत्न करत असे. पॉवरप्लेचा खरा वापर करण्याचे श्रेय वीरेंद्र सेहवागला जाते. भारतीय संघाच्या माजी फलंदाजाने सचिन तेंडुलकरसोबत अनेक ऐतिहासिक खेळी खेळल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतकं झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. सेहवागनेही ६ द्विशतके झळकावली आहेत. २००८ साली श्रीलंकेविरुद्धच्या नाबाद २०१ च्या इनिंगबद्दल सेहवागने मोठा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालिकेतील दुसऱ्या कसोटीदरम्यान, सेहवाग २०१ धावांवर नाबाद राहिला, जेव्हा संपूर्ण संघातील केवळ दोन फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले होते. त्याचे द्विशतक असूनही संघ केवळ ३२९ धावा करू शकला. भारताने हा सामना १७० धावांनी जिंकला. या सामन्यात अजंथा मेंडिस आणि मुथय्या मुरलीधरन यांनी शानदार गोलंदाजी करत सामन्यात १५ बळी घेतले. त्या सामन्याबद्दल बोलताना सेहवाग म्हणाला की, जर इशांत शर्माने त्याला फलंदाजीचा आग्रह केला नसता, तर तो अधिक धावा करू शकला असता.

मी स्वार्थी का असेन?

यूट्यूबर रणवीर अल्लाबदियासोबतच्या चॅट दरम्यान, सेहवागने आठवण करून दिली की जर ११व्या क्रमांकाचा फलंदाज इशांत शर्माने त्याला सिंगल घेण्यास सांगितले नसते, तर तो डावात अधिक धावा करू शकला असता. सेहवाग म्हणाला, मूळ प्रश्न ड्रेसिंग रूममधील नकारात्मक प्रभावांचा होता. वाईट व्हायब्स या अर्थाने की काहींना धावा करायच्या असतात, पण इतरांना अपयशीही करायचे असते. मी आणि समोरच्या माणसाने धावा कराव्यात अशी नेहमीच इच्छा होती. जे चांगले खेळतील ते शेवटी निवडले जातील. मग मी स्वार्थी कसा ठरेल?

हेही वाचा – Babar Azam: IPL की BBL? बाबर आझमने निवडली आपली आवडती लीग, जाणून घ्या कारण

इशांत दोन चेंडूही टिकू शकला नाही –

सेहवाग म्हणाला, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी १९९ धावांवर फलंदाजी करत होतो. इशांत शर्मा माझा जोडीदार होता. मला माहीत होते की इशांत मुरलीधरन आणि अजंथा मेंडिसला खेळू शकत नाही. त्यावेळी मी स्वार्थी होऊन २०० धावा केल्यानंतर एक धाव घेतली आणि इशांतला स्ट्राइक दिली असती, पण मी स्ट्राइक कायम ठेवली आणि मुरलीधरनविरुद्ध पाच चेंडू खेळले आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली. इशांत माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘भाई, मी खेळेन. तुम्ही विनाकारण घाबरत आहात. मी म्हटलं ठीक आहे. मी २०० धावा केल्या. एक धाव घेतली, माझा स्कोअर २०१ झाला आणि त्याला स्ट्राइक दिली. त्यानंतर इशांत दो चेंडूही टिकू शकला नाही. मग मी त्याला विचारले, ‘म्हणजे तू खेळलास? तुझे काम संपले?’

हेही वाचा – Virat Kohli: “…. म्हणून आरसीबीचं कर्णधारपद सोडलं”, विराट कोहलीचा मोठा खुलासा

२०० धावा करणे माझ्यासाठी महत्त्वाचे नव्हते –

सेहवाग पुढे म्हणाला, “इथे मी विचार करत होतो की मी स्कोअरबोर्डवर आणखी धावा करू शकतो. परंतु इशांत म्हणाला की तो त्या गोलंदाजांचा सामना करेल. माझ्यासाठी २०० धावा करणे महत्त्वाचे नव्हते. मला स्ट्राइकवर राहून संघासाठी जास्तीत जास्त धावा करायच्या होत्या. त्यामुळे हा माझा स्वार्थ नव्हता.” भारताने श्रीलंकेचा डाव २९२ धावांत गुंडाळला. भारताने दुसऱ्या डावात 50 धावा करत २६९ धावा केल्या. ३०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हरभजन सिंगच्या शानदार गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे फलंदाज गारद झाले. इशांतनेही शानदार गोलंदाजी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag opened up about his innings in the second match against sri lanka in 2008 vbm