भारतीय संघातील आपले गमावलेले सलामीचे स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी वीरेंद्र सेहवाग चेन्नईतील एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये वेगवान गोलंदाजांसोबत सराव करत आहे. एमआरएफ पेस फाऊंडेशन येथे ऑस्ट्रेलियाचे महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा प्रशिक्षकांचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. या ठिकाणी मॅकग्राच्या मार्गदर्शनाखाली सेहवाग सराव करीत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सेहवाग वेगवान गोलंदाजांचा सामना करण्याचे कौशल्य आत्मसात करीत आहे.

Story img Loader