करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात कहर केला आहे. या लाटेमुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. या कठीण काळात बरेच लोक आणि सेलिब्रिटी एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे आले. यात माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागही मागे राहिलेला नाही. सेहवागने करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ऑक्सिंजन कॉन्सट्रेटर्स आणि अन्नाची व्यवस्था केली होती. आता त्याने स्वयंपाकघरात एका जेवण करणाऱ्या करोनाग्रस्त महिलेला मदत करण्याचे ठरवले आहे. ही महिला कृत्रिम ऑक्सिजन घेत जेवण बनवत आहे.
‘‘आता शूज चिकटवायची गरज नाही”, क्रिकेटपटूच्या विनंतीनंतर ‘ही’ कंपनी मदतीला धावली
वीरेंद्र सेहवागने या महिलेचा व्हायरल झालेला फोटो आपल्या ट्विटरद्वारे शेअर केला आहे. ”आई ही आई असते. हा फोटो पाहून डोळ्यात पाणी आले. जर मला या महिलेचा नंबर मिळाला तर मला सांगा. ती बरी होईपर्यंत मी तिची आणि तिच्या कुटुंबाच्या जेवणाची व्यवस्था करेन”, असे सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
If anyone can please provide her contact details, please DM @AmritanshuGupta @SehwagFoundatn we want to take care of meals for her and her family till she recovers. https://t.co/o9Kq9p1BPY
— Virender Sehwag (@virendersehwag) May 23, 2021
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग करोना पीडितांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याने देशातील करोना पीडितांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटरसाठी ९०२४३३३२२२ हा हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. या नंबरवरून करोना संक्रमित व्यक्तीचे नातेवाईक व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवून ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची सुविधा मिळवू शकतात. वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटर अकाउंटवर यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला होता.
संकटामागून संकट..! अटकेनंतर कुस्तीपटू सुशील कुमारची नोकरीही जाणार?
भारतात २४ मे २०२१पर्यंत करोना विषाणूमुळे आतापर्यंत ३ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून देशात करोनाची प्रकरणे समोर येऊ लागली काल. गेल्या २४ तासात २.२२ लाख नवीन करोनाचे रुग्ण आढळले असून या कालावधीत ४,४५४ लोकांचा मृत्यू झाला आहे.