Virender Sehwag Reveals Why Virat Carried Sachin On His Shoulder: एकदिवसीय विश्वचषतक २०११ ही स्पर्धा भारताने संयुक्तपणे आयोजित केली होती. या स्पर्धेत भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली २८ वर्षांनी विजेतेपद पटकावले होते. भारतीय संघाने फायनल सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले होते. या विजयानंतर भारतीय संघाने स्टेडियममध्ये चक्कर मारत आपल्या विजयाचे सेलिब्रेशन केले होते. यावेळी भारतीय संघ क्रिकेटचा देव सचिन तेंडुकरला खाद्यावर नाचला होता. यावर आता माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने एक खुलासा केला आहे.
त्यावेळी विराट कोहली भारतीय संघाचा युवा खेळाडू आणि त्या मोहिमेचा एक भाग होता. विराट कोहलीने विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलून घेत अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले होते. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन वानखेडे मैदानावर चक्कर लगावण्याचे मनोरंजक कारण, वीरेंद्र सेहवागने सांगितले आहे.
सेहवाग मंगळवारी आयसीसी २०२३ विश्वचषक स्पर्धेच्या कार्यक्रमात म्हणाला, “सचिनचे वजन खूप जास्त होते, आम्ही वृद्ध होतो. आम्ही त्याला उचलू शकलो नाही. माझ्या खांद्याला दुखापत झाली होती आणि एमएसवा गुडघ्याचा त्रास होता, इतर कोणाला तरी इतर समस्या होत्या. त्यामुळे आम्ही खांद्यावर उचलून घेण्यास नकार दिला आणि युवा खेळाडूंना उचलण्यास सांगितले. त्यानंतर विराट कोहलीने एकट्याने सचिनला उचलून मैदानाला एक राऊंड मारला.”
हेही वाचा – ODI WC 2023: बीसीसीआयच्या विश्वचषक आयोजनावर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया; म्हणाला, “जगाच्या लक्षात राहील अशा…”
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उतरणार आहे. तसेच तो आघाडीच्या स्पर्धकांमध्ये सर्वाधिक प्रवास करणारा संघ असणार आहे. ३४ दिवसांत नऊ लीग सामन्यांसाठी नऊ शहरात जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ ८४०० किमी अंतर कापणार आहे. जर भारत उपांत्य फेरीत आणि नंतर अंतिम फेरीत पोहोचला, तर ४२ दिवसांत ११ सामन्यांसाठी ९७०० किमी अंतर कापेल.
भारत ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील यजमान संघ ८ ऑक्टोबरला चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर १५ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. आयसीसी स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची ही स्पर्धा भारतासाठी उत्तम संधी आहे.
हेही वाचा – Rishabh Pant: विश्वचषकापूर्वी ऋषभ पंतने अचानक का बदलली जन्मतारीख? जाणून घ्या कारण
भारतीय क्रिकेट संघाने २०१३ पासून आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. रोहित, विराट कोहली आणि इतरांसारख्या स्टार्ससाठी २०२३ चा विश्वचषक ही उत्तम संधी आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११च्या हंगामात स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाला आपला आयसीसी ट्रॉफीच दुष्काळ संपवता आलेला नाही.