Virendra Sehwag Son Aryaveer Double Century in CoochBihar Trophy: भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची गणना जगातील सर्वात आक्रमक फलंदाजांमध्ये केली जाते. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्याची त्याची तुफानी शैली गोलंदाजांवर दबाव टाकणारी असायची. त्यामुळेच कसोटीत त्याच्या नावावर दोन त्रिशतकं आहेत. सेहवागच्या निवृत्तीनंतर आता त्याची ही तुफानी फटकेबाजीचा वारसा पुढे नेत आहे. सेहवागचा लेक आर्यवीर सेहवागही क्रिकेटपटू आहे. वडील वीरेंद्र सेहवागप्रमाणेच मुलगा आर्यवीरही तुफानी फटकेबाजी करतो. त्याच्या या फटकेबाजीचा प्रत्यय त्याच्या द्विशतकी खेळीत पाहायला मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्यवीर सेहवागने कूचबिहार ट्रॉफीमध्ये दिल्लीसाठी द्विशतक झळकावून खळबळ उडवून दिली आहे. १७ वर्षीय आर्यवीरने शिलाँगच्या एमसीए क्रिकेट मैदानावर २०० धावांची नाबाद इनिंग खेळली. यादरम्यान त्याने ३४ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आर्यवीरच्या या शानदार खेळीमुळे दिल्ली संघाला २०८ धावांची आघाडी मिळवता आली.

हेही वाचा – IND vs AUS: भारताकडून नितीश रेड्डी-हर्षित राणाचे कसोटीत पदार्पण, जसप्रीत बुमराहने प्लेईंग इलेव्हन जाहीर करत दिला धक्का

दिल्लीकडून सेहवागचा लेक आर्यवीरने २२९ चेंडूत नाबाद २०० धावा केल्या. अर्णव बुग्गाबरोबर डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या आर्यवीरने आपल्या खास खेळीत एकूण ३६ चौकार लगावले. बुग्गाने १०८ चेंडूत ११४ धावांची खेळी खेळली. मेघालयच्या २६० धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तर देताना दिल्लीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८१ षटकांत २ गडी गमावून ४६८ धावा केल्या होत्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत आर्यवीर धन्य नक्रासह फलंदाजी करत होता. धन्या ९८ धावा करून खेळत आहे. कूचबिहार ट्रॉफी ही १९ वर्षाखालील वयोगटातील भारताची प्रमुख बहु-दिवसीय देशांतर्गत स्पर्धा आहे.

हेही वाचा – IND vs AUS: पर्थ कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, रोहित शर्मा ‘या’ तारखेला ऑस्ट्रेलियात दाखल होण्याची शक्यता

२०२४ सुरुवातीला, आर्यवीरने विनू मांकड ट्रॉफीमध्ये मणिपूरविरुद्ध दिल्लीकडून १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने ४९ धावांची शानदार खेळी करत आपला क्लास दाखवून दिला. अशाप्रकारे दिल्लीचा संघ हा सामना ४९ धावांनी जिंकण्यात यशस्वी ठरला. आर्यवीर ज्युनियर क्रिकेटमध्ये सतत धावा करत आहे. गेल्या वर्षी सेहवागने खुलासा केला होता की त्याचा मुलगा आर्यवीर याने आधीच आयपीएल करारावर लक्ष केंद्रित केले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag son aaryavir hits double century in cooch behar trophy for delhi u 19 with 34 fours in innings bdg