आयसीसीने स्लोव ओव्हर रेटच्या नियमांमध्ये बदल केला आहे. याचा फटका काल झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यात दोन्ही संघांना बसला दरम्यान, आयसीसीच्या या नव्या नियमांबाबत भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे. “मी २० धावा जास्त काढू शकतो. मात्र, २० टक्के सामना शुल्क परत मागू शकत नाही”, असे तो म्हणाला. रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही संघाला स्लोव ओव्हर रेटचा फटका बसला, या पार्श्वभूमीवर सेहवाने ही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – Video: “बाबर आझम कसा कर्णधार झाला कळेना”.. IND vs PAK नंतर शोएब अख्तरची टीका; रोहित शर्मालाही सुनावले
नव्या आणि जुन्या नियमांची तुलना करत तो म्हणाला, ”जेव्हा मी आयपीएलमध्ये कप्तानी करत होतो. तेव्हा स्लोव ओव्हर रेटसाठी १० टक्के किंवा २० टक्के सामना शुल्क आकारले जात होते. त्यामुळे एक कर्णधार म्हणून मी लवकरात लवकर षटकं संपवायाच माझा प्रयत्न असायचा. मी २० धावा जास्त काढू शकतो. मात्र, २० टक्के सामना शुल्क परत मागू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली आहे. तसेच ”स्लोव ओव्हर रेटची समस्या केवळ आशिया खंडातील देशानांच येते”, असंही तो म्हणाला.
दरम्यान, रविवारी झालेल्या भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान दोन्ही संघाला स्लोव ओव्हर रेटचा फटका बसला. त्यामुळे नव्या नियमानुसार भारताला शेवटची दोन षटके ३० यार्डमध्ये पाच क्षेत्ररक्षक ठेवावे लागले. तर हाच प्रकार पाकिस्तानबरोबरही घडला.