Babar Azam was advised by Virender Sehwag : बाबर आझम दीर्घकाळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. बाबरची बॅट तिन्ही फॉरमॅटमध्ये शांत दिसत आहे. सध्या पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात बाबर पाकिस्तानचा भाग होता, पण संघाचा पराभव आणि बाबरच्या खराब फॉर्ममुळे त्याला मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून वगळण्यात आले. आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागला विचारले की बाबरने या खराब काळातून सावरण्यासाठी काय करावे? यावर सेहवाग काय म्हणाला जाणून घेऊया.

‘मानसिकदृष्ट्या जास्त परिणाम झाला’ –

शोएबने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सेहवागला विचारले की, “बाबर आझमने बॅटिंगमध्ये काय चूक करत आहे? त्यावर सेहवागने उत्तर दिले की, “जेव्हा फलंदाजाचा खराब काळ चालू असतो, तेव्हा त्याची मानसिकता बिघडते. ज्यामुळे त्याचे शॉट सिलेक्शन चुकते. बाबर आझममध्येही मला तेच दिसते. तो संघाचा कर्णधार होता. आता तो कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. त्याच्याकडून पूर्वी ज्या अपेक्षा होत्या, त्या आता कमी होत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत त्याच्या टेक्निकपेक्षा मानसिकेतेवर जास्त परिणाम झाला आहे. त्याला मानसिकदृष्ट्या खंबीर होऊन पुनरागमन करावे लागेल. तो एक चांगला खेळाडू आहे.”

Kartik Aaryan Recalls His Struggle
वारंवार नकार तरी मानली नाही हार; कार्तिक आर्यनने शेअर केल्या संघर्ष काळातील आठवणी, म्हणाला, “मला लाज…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Income Tax raid on BJP MLA Harvansh Singh Rathore
भाजपाच्या माजी आमदाराच्या घरात आढळल्या मगरी; भ्रष्टाचार प्रकरणात प्राप्तीकर विभागाने धाड टाकताच अधिकारीही चक्रावले
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…

‘बाबर आझमने कुटुंबासोबत वेळ घालवावा’ –

सेहवाग पुढे म्हणाला, “जे चांगले खेळाडू आहेत, ते लवकर पुनरागमन करतात. बाबर आझम पाकिस्तान संघात परत येईल आणि चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे. कधी कधी एखाद्या मोठ्या खेळाडूला एखाद्या सामन्यासाठी किंवा मालिकेसाठी वगळले जाते, तेव्हा तो पूर्वीपेक्षा अधिक कणखर होऊन पुनरागमन करतो.” यानंतर वीरेंद्र सेहवाग सल्ला देताना म्हणाला, “बाबर आझमने काही काळ क्रिकेटपासून दूर राहावे आणि त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करावे. त्याचबरोबर कुटुंबासोबत वेळ घालवावा. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर होऊन दमदार पुनरागमन करावे.”

हेही वाचा – IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताने नोंदवला लाजिरवाणा विक्रम, १९ वर्षांनंतर झाली मोठी उलथापालथ

बाबर आझमची आंतरराष्ट्रीय कारकीर्द –

बाबर आझमने पाकिस्तानसाठी आतापर्यंत ५५ कसोटी, ११७ एकदिवसीय आणि १२३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीच्या १०० डावात ३९९७ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांच्या ११४ डावांमध्ये ५७२९ धावा आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या ११६ डावांमध्ये ४१४५ धावा केल्या आहेत.

Story img Loader