करोना व्हायरसच्या तडाख्यामुळे सध्या जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतभरातील लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Coronavirus : क्रीडाविश्वात हळहळ! महान क्रिडापटूचे उपचारादरम्यान निधन

राज्यासह देशभरात लॉकडाऊन जारी केला गेला, तरीही नागरिकांकडून त्याचे अद्याप गांभिर्याने पालन करण्यात येत नसल्याचे दिसते आहे. काही ठिकाणी कलम १४४ लावूनही त्याचा सर्रास भंग केला जात आहे. त्यामुळे पोलीसही आक्रमक होत असून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना ते दंडुकाचा चोप देताना दिसत आहेत. काही ठिकाणी त्यांच्याकडून कसरतीचे प्रकारदेखील करून घेतले जात आहेत. त्यामुळे अशा विनाकारण घराबाहेर भटकणाऱ्यांसाठी तडाखेबाज माजी फलंदाज विरेंद्र सेहवागने एक झकास उपाय सुचवला आहे.

‘स्क्वेअर कट’ टू ‘हेअरकट’… सचिनचा नवा लूक व्हायरल

लॉकडाउन असून घरात बसण्याचा सल्ला दिला जात आहे, पण तरीदेखील काही लोक बाहेर विनाकारण फिरतात. त्या लोकांना सेहवागने शालजोडीतील चपराक लगावली आहे. “जे लोक लॉकडाउन काळातही विनाकारण रस्त्यांवर भटकंती करत आहेत, त्या लोकांना शिक्षा करू नका. त्यापेक्षा त्या लोकांना थेट करोनारूग्णांच्या सेवेसाठी रूजू करा, कारण या लोकांना खात्री आहे की करोना व्हायरस त्यांचं काहीही वाकडं करू शकणार नाही”, असा संदेश असलेला बोर्ड त्याने पोस्ट केला आहे.

दरम्यान, या आधी मास्टर ब्लास्टर सचिननेही एक संदेश दिला आहे. मी देखील २१ दिवस माझ्या कुटुंबासह घरात बसलो आहे. सरकारच्या विनंतीला मान द्या आणि तुम्हीही घरातच राहा, असे ट्विट त्याने केले होते. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बाहेर पडणाऱ्या लोकांशी सौम्यपणे वागा, त्यांच्यावर थेट लाठीमार करू नका’, असे निर्देश राज्य पोलीस आणि शहर पोलिसांना दिले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag troll slams people who roam outside in coronavirus lockdown covid 19 vjb