भारताचा माजी तडाखेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा आपल्या कल्पक ट्विटसाठी नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा तो विविध गहन विषयांवर आपल्या खास शैलीत मत व्यक्त करतो. आजदेखील सेहवागने एक ट्विट करत आपला माजी सहकारी कुंबळे याच्या ‘टो-क्रशर’ यॉर्कर चेंडूंना उजाळा दिला आहे. या आठवणींना उजाळा देण्याचे निमित्त म्हणजे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे याचा वाढदिवस.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय माजी फिरकीपटू अनिल कुंबळे म्हटलं की साऱ्यांना आठवतो तो पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे एका डावात त्याने घेतलेले दहा बळी. आपल्या फिरकीच्या जादूसाठी तो कायम ओळखला गेला. पण वीरेंद्र सेहवागला मात्र आठवले ते कुंबळेने टाकलेले वेगवान यॉर्कर चेंडू. सेहवागने त्याच्या ट्विटमध्ये कुंबळेला शुभेच्छा देताना याच यॉर्करचे वर्णन केले आहे.

भारतीय संघासाठी ‘मॅच विनर’ ठरलेल्या उत्तम खेळाडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्याने तळाच्या फलंदाजांना फेकलेले यॉर्कर हे वेगवान गोलंदाजापेक्षाही जलद असायचे. अशा या ‘जम्बो’ माणासाला शुभेच्छा.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही त्याला शुभेच्छा दिल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag wishes anil kumble by tweeting about toe crusher yorkers