Happy Birthday Virat Kohli: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. कोहलीचे चाहते देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वाढदिवस साजरा करत आहेत. भारतीय संघ आज कोलकातामध्ये वर्ल्ड कप २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळत आहे. कोलकात्यातील चाहत्यांमध्ये कोहलीबद्दल वेगळीच क्रेझ आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून अभिनंदनाचे संदेशही येत आहेत. अशात टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने एका खास पोस्टद्वारे कोहलीला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर कोहलीसोबतचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “हिमोग्लोबिनप्रमाणे त्याच्या नसांमध्ये शतक धावते. डोळ्यात स्वप्ने असलेल्या एका तरुण मुलाने आपल्या काम, आवड, कठोर परिश्रम आणि प्रतिभेने खेळावर राज्य केले आहे. आयुष्यात चढ-उतार आले, पण जे स्थिर राहिले, ते म्हणजे त्याची तीव्रता आणि भूक. विराट कोहलीला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.”

Bajaj Housing Finance
बजाज हाउसिंग फायनान्सच्या समभागात पदार्पणालाच १३६ टक्के वाढ, वर्षातील चौथी सर्वोत्तम सूचिबद्धता
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Nagpur video | a Foreigner Befriends Elephant
फॉरेनरने केली नागपुरच्या हत्तीबरोबर मैत्री; गणेशोत्सवातील VIDEO होतोय व्हायरल
Mitchell Starc on Virat Kohli about IND vs AUS Test Series
‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’
Duleep Trophy Ishan Kishan 7th first class century
इशान किशनचे झंझावाती शतकासह निवडसमितीला प्रत्युत्तर; दुलीप ट्रॉफी सामन्यात चौकार-षटकारांची लयलूट
Shubman Gill On the challenges of batting at No 3 in Test Cricket
IND vs BAN : ‘आता माझे लक्ष्य…’, तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याच्या आव्हानाबाबत शुबमन गिलचे मोठे वक्तव्य; म्हणाला, अर्धशतकांचे मोठ्या…
Duleep Trophy 2024 Dhruv Jurel equaled MS Dhonis record
Duleep Trophy 2024 : विक्रमांचा ‘ध्रुव’तारा; जुरेलने केली महेंद्रसिंग धोनीच्या २० वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी
Musheer Khan Century in India b vs India a
Duleep Trophy 2024: मुशीर खानचे दुलीप ट्रॉफीमध्ये शानदार शतक, भाऊ सर्फराज खानच्या प्रतिक्रियेने वेधले लक्ष, पाहा VIDEO

विश्वचषकात विराट जबरदस्त फॉर्ममध्ये आहे –

या विश्वचषकात विराटचा विक्रमही उत्कृष्ट ठरला आहे. त्याने सात सामन्यांच्या सात डावात ८८.४० च्या सरासरीने ४४२ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. यापूर्वीच्या काही प्रसंगी तो शतक झळकावण्यास मुकला होता. मात्र, विराट या सामन्यात शतक झळकावून चाहत्यांना आनंदी होण्याची संधी देऊ इच्छितो. विराटने आतापर्यंत वनडेमधील २८८ सामन्यांच्या २७६ डावांमध्ये ५८.०५ च्या उत्कृष्ट सरासरीने १३,५२५ धावा केल्या आहेत. यामध्ये ४८ शतके आणि ७० अर्धशतके आहेत. १८३ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

हेही वाचा – Virat Kohli Birthday: किंग कोहलीच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याचे कार कलेक्शन

कोहलीच्या वाढदिवशी भारताच्या नावावर आहे मोठा विक्रम –

विराट कोहलीचा वाढदिवस भारतीय संघासाठी खूप भाग्यवान ठरला आहे. आतापर्यंत ५ नोव्हेंबरला झालेल्या सर्व सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. आता संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तेच आवडेल.