टीम इंडियाचा माजी धडाकेबाज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे तर खूप प्रसिद्ध होताच पण निवृत्तीनंतर ही तो त्याच्या वेगवेगळ्या कमेंट्स आणि अनोख्या ट्विटमुळे खूप चर्चेत आहे. असचं काहीसं ट्विट त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून करत चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. त्यात त्याने २००४ सालच्या पाकिस्तान दौऱ्यातील कसोटी क्रिकेटमध्ये त्याने माजी कर्णधार राहुल द्रविडसोबत केलेल्या नाबाद ४०४ धावांच्या विक्रमी फलंदाजीचा फोटो शेअर केला आहे.
वीरेंद्र सेहवागने केलेल्या त्या पोस्टमध्ये त्याने सर्व चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. तो म्हणतो की, “ स्कोअर कार्ड विसरा आणि या प्लेईंग इलेव्हनमधील सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ओळखा.” त्यावर खूप साऱ्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर देत त्याला बरोबर आहे असा प्रतिप्रश्न केला आहे. त्यातील खर उत्तर अजूनही कोणाला देता आलेले नाही. आमच्या अंदाजानुसार त्यात महान फलंदाज सचिन तेंडूलकर आणि सौरव गांगुली हे व्हीव्हीएस लक्ष्मण नंतर फलंदाजीला येणार होते आणि राहुल द्रविड सारख्या मधल्या फळीतील फलंदाज याने सलामीला येत शानदार शतक करत विक्रमी भागीदारी करण्यात मोलाचे योगदान दिले होते.
तो सामना खराब हवामानामुळे अनिर्णीत राहिला होता. त्यात सेहवागने दुसऱ्यांदा मुलताननंतर द्विशतक झळकावले होते. आणखी एक मजेदार बाब म्हणजे दोघांच्या धावसंख्येची बेरीज केली तरी देखील ४०० धावा होत नाहीत. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांनी इतकी खराब गोलंदाजी केली की तब्बल २८ धावा या त्यांनी जास्त दिल्या. तसेच ७६ षटक आणि दीड दिवसात भारताने ४०० धावांचा टप्पा ओलांडला होता.
प्रत्युत्तरात हरभजन सिंगने त्याला फलंदाजीच्या क्रमवारीत ११व्या क्रमांकावर ठेवल्याबद्दल दु:ख व्यक्त केले, ज्यावर सेहवागने त्याला सांगितले की त्याने त्या वेळेपर्यंत कसोटीत शतक झळकावलेले नव्हते. हरभजनची खिल्ली उडवण्यासाठी युवराज सिंग मधेच ओरडला. सेहवागने त्याच्या चाहत्यांकडून ही मनोरंजक गोष्ट विचारलेली असताना त्यानेच याचे उत्तर सांगितले की विशेष म्हणजे, स्कोअरकार्डमधील सर्व अकरा खेळाडूंच्या नावावर किमान एक कसोटी शतक आहे ज्यात अजित आगरकर आणि अनिल कुंबळे यांनी अनुक्रमे २००२ आणि २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध धावा केल्या होत्या आणि हरभजन सिंगने २०१० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर दोन लागोपाठ शतके ठोकली होती.
अशीच काहीसी परिस्थिती इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात केली होती. बेन डकेट आणि जॅक क्रोली यांनी इंग्लंड संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि ३५.३ षटकात २३३ धावा केल्या. जाहिद महमूदने ही भागीदारी तोडली. झाहिदने त्याच्या १०व्या (३४व्या डाव) षटकातील चौथ्या चेंडूवर डकेटला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. डकेटने ११० चेंडूत १५ चौकारांच्या मदतीने १०७ धावा केल्या. जाहिदची ही पहिलीच कसोटी विकेट होती. डावाच्या ३७व्या षटकात जॅक क्रोली हारिस रौफचा बळी ठरला. हरिसने त्याला त्रिफळाचीत करून तंबूचा रस्ता दाखवला. त्याने १११ चेंडूत २१ चौकारांसह १२२ धावांची खेळी केली. ओली पोपही त्याच शैलीत खेळताना दिसला आणि त्याने जाहिद महमूदच्या डावाच्या ३८व्या षटकात तीन चौकार मारले.
हेही वाचा : IND vs BAN 1st ODI: कर्णधार रोहित शर्माने मोडला ‘या’ दिग्गज खेळाडूचा विक्रम, जाणून घ्या
इंग्लंडच्या सलामीवीरांची ही फटकेबाजी सुरू असताना टीम इंडियाच्या वीरेंद्र सेहवाग व राहुल द्रविड यांच्या ४१० धावांच्या विक्रमी भागीदारीची स्कोअरशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. भारतीय संघाने २००६च्या पाकिस्तान दौऱ्यावर लाहोर कसोटीत पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या होत्या. पाकिस्ताने पहिला डाव ७ बाद ६७९ धावांवर घोषित केल्यानंतर वीरेंद्र सेहवाग व राहुल द्रविड ही जोडी सलामीला आली. कर्णधार द्रविड व वीरूने पहिल्या विकेटसाठी ४१० धावांची विक्रमी भागीदारी केली. वीरू २४७ चेंडूंत ४७ चौकार व १ षटकारासह २५४ धावांवर माघारी परतला, द्रविड १२८ धावांवर नाबाद राहिला आणि हा सामना अनिर्णीत राहिला होता.