दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री कृती सेनन मुख्य भूमिकेत असलेला ‘आदिपुरूष’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण, सिनेमागृहात येण्याच्या पूर्वीपासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. या चित्रपटावर भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने भाष्य केलं आहे.
वीरेंद्र सेहवाग आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. आता ‘आदिपुरूष’ चित्रपट पाहिल्यांनतर सेहवागने खिल्ली उडवली आहे. ‘कट्टापाने बाहुबलीला का मारलं, हे आता कळलं,’ असं ट्वीट सेहवागने केलं आहे. सेहवागचं हे ट्वीट व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
ट्वीट करत सेहवाग म्हणाला की, “आदिपुरुष पाहिल्यानंतर कळलं की, कट्टापाने बाहुबलीला का मारलं होतं.”
या ट्विटनंतर सेहवागला ट्रोल करण्यात येत आहे. एकजण म्हणाला की, “एका आठवड्यानंतर जोक कॉपी केला.”
तर, दुसऱ्याने म्हटलं की, “पुन्हा चित्रपट पाहण्यासाठी कधी जाणार आहे?”
दरम्यान, ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १६ जूनला प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाने २०० कोटींच्या वर कमाई केली आहे. ‘आदिपुरुष’ने पहिल्या दिवशी ८६ कोटी, दुसऱ्या दिवसी ६५.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी २९.०३ कोटी, चौथ्या दिवशी १६ कोटी, पाचव्या दिवशी १०.०७ कोटी, सहाव्या दिवशी ७.२५ कोटी, आठव्या दिवशी ३.५० कोटी आणि नवव्या दिवशी ५.२५ कोटी कमावले आहेत. आतापर्यंत सिनेमाने २६८.५५ कोटींचा गल्ला जमावला आहे.