Viswanathan Anand D Gukesh Dance Viral Video : भारताचा नावाजलेला बुद्धिबळपटू विदीत गुजराथी आणि निधी कटारीया हे दोघे २ एप्रिल रोजी लग्न बंधनात अडकले आहेत . त्यांच्या लग्न सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. विदीतच्या लग्न सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण व्हिडीओमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे ते भारताचे दिग्गज बुद्धिबळपटू आणि पाच वेळचे विश्वविजेते विश्वनाथन आनंद यांच्या डान्सने.
विदीतचा लग्नसोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी बुद्धिबळ जगतातील अनेक खेळाडू उपस्थित होते. यामध्ये माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद याच्यासह सध्याचा विश्वविजेता डी गुकेश, अर्जुन इरिगैसी, आर प्रज्ञानंद, तानिया सचदेव, डच ग्रँडमास्टर अनिश गिरी आणि त्याची पत्नी सोपीको यांनी देखील हजेरी लावली होती.
या जंगी लग्न सोहळ्यात सर्वच बुद्धिबळपटू हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसले. यापैकी काही व्हिडीओ व्हायरल झाले असून यापैकी एका व्हिडीओमध्ये गुकेश हा ‘बद्री की दुल्हनिया’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. इतकेच नाही तर अत्यंत शांत स्वभावासीठी ओळखले जाणारे विश्ननाथन आनंद हे देखील चक्क ‘मैं हूं डॉन’या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळाले.
I AM LAUGHING, CRYING, SCREAMING ALL AT THE SAME….NEVER HAVE I EVER THOUGHT I WOULD SEE GUKESH DANCING IN "BADRI KI DULHANIA" OR VISHY SIR IN "MEIN HOON DON"
— _khamoshii_ (@_khamoshii_) April 1, 2025
VIDIT MADE IT POSSIBLE pic.twitter.com/ZDtkbWh8tC
हे व्हिडीओ इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यावर अनेकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. बऱ्याच जणांना विश्वनाथन आनंद डान्स करताना पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच काही वापरकर्त्यांनी विवाह बंधनात अडकलेल्या जोडप्याला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दुसर्या एका व्हिडीओमध्ये गुकेश एका हिंदी गाण्यावर थिरकताना दिसत आहे. ज्यामध्ये अनिश गिरी आणि सोपिको हे देखील त्याला साथ देताना दिसत आहेत.
GUKESH ANISH SOPIKO DANCING THEIR HEART OUT….THE KIND OF CONTENT I WAS DIEING TO SEE ??❤️? pic.twitter.com/f2nsfPW0IL
— _khamoshii_ (@_khamoshii_) April 1, 2025
भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश हा गेल्या वर्षी विश्वविजेते पदाला गवसणी घातली आहे . दोम्माराजू गुकेशने वयाच्या १८व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला आहे. गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता डिंग लिरेनचं आव्हान मोडून काढत इतिहास घडवला. हा पराक्रम करणारा तो सर्वात तरुण खेळाडू आहे.
सध्या जागतिक क्रमवारीत तीसऱ्या क्रमांकावर असलेला गुकेश हा पॅरिसमध्ये होणाऱ्या फ्रिस्टाईल ग्रँड स्लॅम टूर साठी तयारी करत आहे. ही स्पर्धा ७ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान होणार आहे. त्याच्याबरोबर या स्पर्धेत विश्वनाथन आनंद, विदीत गुजराथी, अर्जुन एरिगैसी (सध्या जागतिक क्रमवारीत चौथा), आर. प्रज्ञानंद, मॅग्नस कार्लसन, हिकारू नाकामुरा आणि व्हिन्सेट केयमेर या खेळाडूंशी त्याचा सामना होणार आहे.