मायकेल अ‍ॅडम्स याच्याकडून पहिल्याच फेरीत स्वीकारलेल्या पराभवातून विश्वविजेता विश्वनाथन आनंद अद्याप सावरलेला नाही. त्याला अल्खाइन-पॅरिस बुद्धिबळ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत निकेत वितुइगोव्हविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली.
अ‍ॅडम्सने आनंदवरील विजयानंतर या स्पध्रेच्या दुसऱ्या फेरीत रशियाच्या पीटर स्विडलरला पराभूत केले आणि आघाडी कायम राखली. दुसऱ्या फेरीअखेर त्याचे दोन गुण झाले आहेत. माक्झिम लाग्रेव्ह याने दीड गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे. त्याने चीनच्या दिंग लिरेन याचा पराभव केला. लिवॉन आरोनियन याने तुल्यबळ खेळाडू व्लादिमीर क्रामनिक याच्यावर मात करीत अनपेक्षित विजय नोंदविला. बोरिस गेल्फंड याला लॉरेन्ट फ्रेन्सिनोव्हने बरोबरीत रोखले.
आनंदने निकेतविरुद्धच्या डावात निम्झो इंडियन बचाव तंत्राचा उपयोग केला. दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला बचावात्मक खेळ केला. डावाच्या मध्यास निकेतची बाजू थोडीशी वरचढ होती, मात्र दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे मोहरे घेतल्यानंतर निकेतने आनंदचा बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा