Vitality Blast Northamptonshire vs Somerset No Ball incident : इंग्लंडच्या टी-२० ब्लास्ट लीगमध्ये एक विचित्र घटना पाहायला मिळाली, जेव्हा क्रिकेटच्या एका नियमामुळे चाहतेही गोंधळले. गुरुवार ५ सप्टेंबर रोजी सॉमरसेट आणि नॉर्थहॅम्प्टनशायर यांच्यात सामना झाला. या सामन्यात गोलंदाजाला यष्टिरक्षकाच्या एका छोट्याशा चुकीची मोठी शिक्षा भोगावी लागली. कारण नॉर्थम्प्टनशायरच्या गोलंदाजांने चेंडू टाकताना कोणतीही चूक केली नाही. तसेच त्याच्या या चेंडूवर सॉमरसेटचा फलंदाजही यष्टीचीत झाला, तरीही अंपायरने नो बॉल दिला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या चेंडूला नो बॉल देण्यामागे काय कारण होते? ते जाणून घेऊया.

यष्टीरक्षकाने काय केली चूक?

खरं तर, १४व्या षटकातील चौथा चेंडू सैफ झायबने कोहलर कॅडमोरला टाकला. यावर कॅडमोरकडून शॉट खेण्यात चूक झाली आणि चेंडू हुकला. यानंतर यष्टिरक्षकाने लगेच चेंडू पकडला आणि त्याला यष्टिचीत केले. अशा स्थितीत थर्ड अंपायरला रेफर करण्यात आले. व्हिडीओ रिप्लेमध्ये थर्ड अंपायरला असे दिसून आले की यष्टीरक्षकाने एवढी घाई केली की त्याने चेंडू यष्टीच्या पुढे जाऊन चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच यष्टिरक्षक चेंडू पकडण्यापूर्वी त्याचे हॅन्ड ग्लोव्हज यष्टीच्या पुढे गेले होते. याावेळी फलंदाज क्रीझमध्ये नव्हता.चेंडू यष्टीपर्यंत पोहोचण्या अगोदर यष्टीरक्षकाचे ग्लोव्हज यष्टीच्यापुढे आले होते.

Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल

मात्र, त्याने चेंडू यष्टीच्या मागेच पकडला होता. असे असतानाही नो बॉल देण्यात आला. ज्यामुळे मिळालेली विकेट गमवावी लागली. यावरून आता वाद निर्माण झाला आहे. क्रिकेटमध्ये असे अनेक नियम आहेत जे आश्चर्यकारक आहेत. या नियमांमुळे अनेक वेळा सामन्याचा निकाल बदलतो आणि वादही निर्माण होतात. सॉमरसेट आणि नॉर्थम्प्टनशायर यांच्यातील सामन्यातही असेच घडले. आम्ही तुम्हाला नियमाविषयी सांगण्यापूर्वी, त्यामुळे कोणते परिणाम होतात हे जाणून घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा – PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका

विकेट ऐवजी षटकार मिळाला –

वास्तविक, ज्या चेंडूला विकेटवर मिळण्याची शक्यता होती, त्याचे रूपांतर षटकारात झाले. कारण अंपायरने नो बॉल दिल्यानंतर फलंदाजाला फ्री हिट मिळाली. त्याचा फायदा घेत त्याने षटकार मारला, जेव्हा तो यष्टीचित झाला होता. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला राग काढण्यास सुरुवात केली. ते म्हणाला की, विकेटच्या मागून चेंडू पकडल्यानंतरही नो बॉल न देणे हा चुकीचा निर्णय आहे. काही चाहत्यांनी यापूर्वी घडलेल्या अशाच घटनांचा उल्लेख केला.

हेही वाचा – कुस्तीपटू विनेश व बजरंगचा भारतीय रेल्वेतील नोकरीचा राजीनामा, काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

आऊट ऐवजी नो बॉल का दिला गेला?

आयसीसीच्या नियमांनुसार, स्ट्रायकरच्या एंडला फक्त यष्टिरक्षकाला विकेटच्या मागे उभे राहावे लागते. जोपर्यंत फलंदाजाने त्याच्या बॅटने चेंडूला स्पर्श केला नाही किंवा चेंडू यष्टीच्या मागे जात नाही, तोपर्यंत यष्टिरक्षक यष्टीच्या पुढे येऊ शकत नाही. फलंदाज खेळण्यापूर्वी यष्टिरक्षक स्वत: पुढे आला किंवा यष्टीच्यापुढे ग्लोव्हज आणले, तर पंचांना त्याला डेड बॉल किंवा नो बॉल देण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा स्थितीत फलंदाज यष्टिचीत झाला, तरी त्याला आऊट मानले जात नाही. सॉमरसेट आणि नॉर्थॅम्प्टनशायर यांच्यातील सामन्यातही हेच पाहायला मिळाले, त्यानंतर चाहत्यांनी या नियमावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.