आयसीसी २०१९ विश्वचषकासाठी फक्त 5 महिन्यांचा कालावधील बाकी आहे. त्यामुळे या स्पर्धेबद्दलच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. हा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये होणार आहे. तसेच या विश्वचषकाचा अंतिम सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडणार आहे. ३० मे २०१९ पासून सुरु होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेच्या विजयाचे प्रबळ दावेदार कोण असतील याचा अंदाज वेस्ट इंडिजचा महान फलंदाज व्हिवियन  रिचर्डस् यांनी व्यक्त केला आहे.

यजमान इंग्लंडसह भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे संघ २०१९ च्या आयसीसी क्रिकेट विश्वकपमध्ये जेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे वेस्ट इंडिजचा महान फलंदाज व्हिवियन रिचर्डस्ने यांनी म्हटले आहे. रिचर्डस् म्हणाले, इंग्लंड चांगला खेळत आहे, पण ते अखेरच्या क्षणी पिछाडीवर पडतात. पाकिस्तान आणि भारत या संघांमध्ये कुठल्याही संघांना पराभूत करण्याची क्षमता आहे. आॅस्ट्रेलियाही शानदार संघ आहे. त्यामुळे माझ्या मते या चार-पाच संघांमध्ये २०१९ चा विश्वकप जिंकण्याची क्षमता आहे.

30 मे २०१९ रोजी विश्वचषकाचा पहिला सामना यजमान इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा होणार आहे. तर भारत पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिके विरुद्ध साउथँप्टन येथे खेळणार आहे. अंतिम सामना १४ जूलैला पार पडेल.

Story img Loader