अग्रमानांकित व गतविजेत्या स्टानिस्लास वॉवरिंकाने आपल्या दर्जास साजेसा खेळ करत चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. त्याने फ्रान्सच्या बेनोईट पेअरीचे आव्हान ६-३, ६-४ असे परतविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वॉवरिंकाने झंझावाती सव्‍‌र्हिसचा उपयोग केला, तसेच त्याने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ केला. पहिल्या सेटमध्ये त्याने सहाव्या गेमच्या वेळी सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. ४-२ अशा आघाडीनंतर त्याने स्वत:ची सव्‍‌र्हिस राखली. आपली आघाडी कायम ठेवीत त्याने हा सेट घेतला.

दुसऱ्या सेटमध्ये त्याने चौथ्या गेममध्ये सव्‍‌र्हिस ब्रेक मिळविला. ३-१ अशी आघाडी घेतल्यानंतर त्याने सामन्यावरील पकड कायम ठेवली. हा सेट ६-४ असा घेत त्याने सामनाही जिंकला.

वॉवरिंकाने आतापर्यंत पेअरी याच्याविरुद्ध सात सामन्यांपैकी सहा सामने जिंकले आहेत.

वॉवरिंका म्हणाला की, ‘‘आज मला एवढा सोपा विजय मिळेल अशी अपेक्षा नव्हती. तो सव्‍‌र्हिस चांगली करीत होता, मात्र बॅकहँडच्या फटक्यांबाबत त्याला नियंत्रण ठेवता आले नाही.’’