VVS Laxman Replace Rahul Dravid To Become Next Head Coach Of Team India : एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा हा शेवटचा सामना होता. नोव्हेंबर २०२१ मध्ये, तो २ वर्षांच्या करारावर टीम इंडियामध्ये सामील झाला होता. रिपोर्ट्सनुसार, आता त्याला कोचिंग कॉन्ट्रॅक्ट वाढवायचा नाही.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळणार आहे. द्रविडच्या जागी दुसरा कोणीतरी त्याचा सहकारी खेळाडू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मण याला स्थान दिले जाईल. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे.

लक्ष्मणने अगोदरही प्रशिक्षकाची भूमिका निभावलीय –

सध्या लक्ष्मण भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. राहुल द्रविडचा प्रशिक्षक असतानाही त्याने अनेकदा ही भूमिका साकारली आहे. नुकताच तो संघासोबत आयर्लंड दौऱ्यावर गेला होता. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकानंतर न्यूझीलंड दौऱ्यावर मर्यादीत षटकांच्या मालिकेतही तो प्रशिक्षक होता.

हेही वाचा – IND vs AUS : भारताच्या युवा खेळाडूंचा कस! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला ट्वेन्टी-२० सामना आज; फलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष

लक्ष्मण पूर्णवेळ प्रशिक्षक असेल –

बीसीसीआयच्या सूत्राचा हवाला देत टाईम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे की, “लक्ष्मणने या कामात रस दाखवला आहे. विश्वचषकादरम्यान लक्ष्मण यासंदर्भात बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी अहमदाबादला गेला होता. तो दीर्घकाळ टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून करार करू शकतो. तो प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून हा त्याचा पहिलाच दौरा असेल.”

मात्र, द्रविडसह त्याच्या सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका निभावणारे इतर प्रशिक्षक काय निर्णय घेतात, हे पाहायचे आहे. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांच्याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला टी-२० सामना १० डिसेंबरला होणार असून ४ ते ५ डिसेंबरपर्यंत संघ दौऱ्यावर रवाना होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – रोहित शर्मा, विराट कोहलीने मागितली माफी; Video पाहून चाहते हळहळले, पण ‘ही’ बाब माहितेय का?

द्रविडला एनसीए प्रमुख होण्यास कोणतीही अडचण नाही –

टाइम्स ऑफ इंडियाने असेही वृत्त दिले आहे की, “द्रविडने बीसीसीआयला कळवले आहे की, त्याला प्रशिक्षकपदी राहण्यात रस नाही. जवळपास २० वर्षे त्यांनी भारतीय संघासोबत एक खेळाडू म्हणून दौरा केला आहे. गेल्या काही वर्षांत प्रशिक्षक म्हणून त्यांनी हे काम केले. आता त्याला हे करायचे नाही. एनसीए प्रमुखाची भूमिका घेण्यास त्याला कोणतीही अडचण नाही, ज्यामुळे त्याला त्याच्या मूळ गावी बेंगळुरूमध्ये राहण्याची परवानगी मिळते. तो यापूर्वी एनसीएचे प्रमुखही होता. लक्ष्मणसारखे प्रशिक्षक म्हणून अधूनमधून काम करायला त्याची काही हरकत नाही.”

Story img Loader