भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण निवृत्तीनंतर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय झाला आहे. लक्ष्मण सध्या आयपीएल २०२१ या स्पर्धेत सनराइजर्स हैदराबाद या संघाचा मेंटॉर आहे. क्रिकेट समालोचन करण्यासोबत त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट बरंच काही सांगून जातात. त्याच्या व्हेरी व्हेरी स्पेशल पोस्टची त्याचे चाहतेही आतुरतेने वाट बघत असतात. लक्ष्मणचं क्रिकेट व्यतिरिक्त सामाजिक प्रश्नांकडेही बारीक लक्ष असतं. आपल्या पोस्टच्या माध्यमातून तो त्यावर प्रकाश टाकत असतो. नुकतंच लक्ष्मणने ७५ वर्षीय सेल्वमा या महिलेचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ही महिला सौरउर्जेचा वापर करत मके भाजत असल्याचं फोटोत दिसत आहे.

सेल्वमा यांना कोळसे पेटवण्यासाठी यापूर्वी हातपंखा वापरावा लागत होता. वारंवार हाताने वारा घालून धग कायम ठेवण्यासाठी उर्जा खर्च होत होती. अखेर त्यांनी त्यावर मार्ग काढत सौरउर्जेवर चालण्यारा पंखा घेण्याचा विचार केला. त्यांनी नुसता विचार केला नाही तर प्रत्यक्ष कृतीत उतरवलं. हे सर्व पाहिल्यानंतर लक्ष्मणलाही आनंद वाटला आणि त्यांनी सेल्वमा यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

सेल्वमा या सौरउर्जेवर नुसता पंखा नाहीतर रात्रीच्या वेळेस एलईडी लाईट्सही वापरतात. त्यामुळे त्यांची ही कल्पना व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणला चांगलीच भावली. त्यानंतर त्याने लागलीच हा फोटो शेअर केला. यापूर्वीही लक्ष्मणने भन्नाट क्लुप्त्या वापरण्याऱ्या लोकांचं सोशल मीडियावर कौतुक केले आहे.

IPL 2021 : मुंबई इंडियन्सची ‘ती’ लाजिरवाणी परंपरा कायम!

व्हिव्हिएस लक्ष्मण सनराईजर्स हैदराबाद संघासोबत गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. २०१६ मध्ये त्यांच्या संघाने आयपीएल चषकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आतापर्यंत प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकले नाहीत. यंदाच्या आयपीएल पर्वात पुन्हा नव्या जोशाने उतरण्याचा सनराईजर्स हैदराबादचा मानस आहे. सनराईजर्स हैदराबादचा चेन्नईत ११ एप्रिलला कोलकाता नाइटराईडर्ससोबत सामना आहे.

 

Story img Loader