माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सोमवारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे क्रिकेट संचालक म्हणून पदभार स्वीकारला. ४७ वर्षीय लक्ष्मणची गेल्या महिन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एनसीएच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली होती. भारताच्या वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झालेल्या राहुल द्रविडची जागा त्याने घेतली आहे. मात्र, लक्ष्मण यापुढे आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करू शकणार नाही.

व्हीव्हीएस लक्ष्मणने एनसीएमधील दोन फोटोंसह ट्वीट केले. ‘एनसीए कार्यालयात पहिला दिवस. रोमांचक आव्हान. मी भारतीय क्रिकेटच्या भविष्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे”, असे लक्ष्मणने म्हटले. हे पद स्वीकारण्यापूर्वी लक्ष्मण आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादसाठी मार्गदर्शक होता. लक्ष्मणच्या कोचिंगच्या अनुभवाविषयी सांगायचे तर तो ६ वर्षे क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा फलंदाजी सल्लागारही होते. कॉमेंट्री बॉक्समध्येही तो एक परिचित चेहरा राहिला आहे.

हेही वाचा – VIDEO : काय रे हे..! पत्रकारानं प्रश्न विचारण्यापूर्वीच रागानं लालबुंद झाला पाकिस्तानचा हसन अली; मग पुढे जे घडलं ते पाहाच..!

व्हीव्हीएस लक्ष्मणच्या ट्वीटवर, भारतीय ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने प्रतिक्रिया दिली त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अश्विनने ट्वीट केले, ‘शहरातील नवा क्लास टीचर. शुभेच्छा लच्छी भाई.” बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीvs लक्ष्मणला एनसीएमध्ये सामील होण्यासाठी राजी केले. मानधन कमी असतानाही लक्ष्मणने एनसीएमध्ये सामील होण्यास सहमती दर्शवल्याचे गांगुलीने सांगितले होते.

टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडने एनसीएत युवा खेळाडूंना तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता ही जबाबदारी लक्ष्मणवर आहे. तो संपूर्ण कुटुंबासह बंगळुरूला शिफ्ट झाला आहे. गांगुली अध्यक्ष झाल्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

Story img Loader