भारतीय क्रिकेटपटू के.एल. राहुल दुखापतीमुळे आयपीएलपासून खेळलेला नाही. राहुल आता एनसीएमध्ये टीम इंडियात पुनरागमनाची तयारी करत आहे. सध्या तो वेगाने बरा होत आहे. राहुल मैदानात परतण्यासाठी उत्सुक आहे, तो आशिया चषक मध्ये पुनरागमन करू शकतो. त्याने स्वतः एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जिममध्ये लेग प्रेस करत आहे. मांडी मध्येच त्याला दुखापत झाल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. मात्र, आता तो हळूहळू बरा होत असल्याने चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

के.एल. राहुलला आयपीएल २०२३ दरम्यान दुखापत झाली होती. आयपीएलमध्ये, तो लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे, परंतु दुखापतीमुळे त्याला टूर्नामेंटमधूनच बाहेर पडावे लागले. यानंतर तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधूनही बाहेर पडला होता. राहुलवर शस्त्रक्रिया झाली असूनआता तो बरा झाला आहे. राहुलने याआधीही जिमचा फोटो शेअर केला होता, यावेळी त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये राहुल लेग प्रेस करत आहे, त्याचा ट्रेनरही त्याच्यासोबत आहे. राहुलचा पाय आता बरा वाटत असून, तो लवकरच मैदानात परतण्याच्या तयारीत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान क्रिकेट आशिया चषक खेळवला जाणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेत ही स्पर्धा होणार आहे. भारत आपले सामने फक्त श्रीलंकेत खेळणार आहे. के.एल. राहुल हा संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे, तो जर संघात आला तर टीम इंडियाची फलंदाजी अधिक मजबूत होईल. बीसीसीआय आशिया कपपूर्वी आयर्लंड दौऱ्यासाठी राहुलची निवड करू शकते. आयर्लंड दौऱ्यावर भारत ३ टी२० सामने खेळणार आहे.

हेही वाचा: IND vs WI: “माझी आई तुला बघायला आली असून तू शतक…”; कॅरेबियन विकेटकीपर निघाला विराट कोहलीचा मोठा फॅन, Video व्हायरल

के.एल. राहुल दुखापत अपडेट

के.एल. राहुलने बुधवारी एक व्हिडीओ देखील शेअर केला, ज्यामध्ये तो केवळ जिममध्ये सराव करतानाच नाही तर फुटबॉल खेळताना आणि नेटमध्ये सराव करतानाही दिसत होता. राहुलचा आशिया चषक संघात निश्चितपणे समावेश केला जाऊ शकतो जर त्याआधी आयर्लंड दौऱ्यावर त्याची निवड झाली तरच. याबाबत बीसीसीआयची निवड समिती लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा: World Cup 2023: भारत-पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी चाहत्यांचा देसी जुगाड, हॉटेल दर परवडत नाही म्हणून केले ‘या’ ठिकाणी बुकिंग

३१ वर्षीय के.एल. राहुल क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आतापर्यंत भारतासाठी ४७ कसोटी, ५४ एकदिवसीय आणि ७२ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे २६४२, १९८६ आणि २२६५ धावा केल्या आहेत.