Wanindu Hasaranga has broken records Muralitharan : कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात, श्रीलंकेने डकवर्थ लुईस नियमाच्या मदतीने झिम्बाब्वेचा ८ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात दोन्ही संघांसाठी २७-२७ षटकांचे नियोजन करण्यात आले होते. प्रथम खेळताना झिम्बाब्वे २२.५ षटकांत ९६ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात श्रीलंकेने १६.४ षटकांत २ गडी गमावून सामना जिंकला. दरम्यान या सामन्यात वानिंदू हसरंगाने शानदार गोलंदाजी करत अनेक विक्रमांची रांग लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाने गुरुवारी (११ जानेवारी) कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने या सामन्यात आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने इतिहास रचला. हसरंगाने ५.५ षटकांत १९ धावांत ७ विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने आपला देशबांधव मुथय्या मुरलीधरनचा विक्रम मोडला.

मुरलीधरनचा विक्रम मोडला –

फिरकीपटू म्हणून वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजीच्या बाबतीत हसरंगा तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने आपला देशबांधव मुथय्या मुरलीधरनचा विक्रम मोडला. ज्याने २०० साली भारताविरुद्ध ३० धावांत ७ विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत शाहिद आफ्रिदी (७/१२) पहिल्या स्थानावर आणि राशिद खान (७/१८) दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IND vs AFG 1st T20 : रोहित शर्मा शून्यावर धावबाद झाल्यानंतर गिलवर संतापला, शुबमनवर ओरडतानाचा VIDEO व्हायरल

जगातील ५ सर्वोत्तम गोलंदाजी आकडे असलेले गोलंदाज –

श्रीलंका: चामिंडा वास- १९/८ विरुद्ध झिम्बाब्वे, २००१
पाकिस्तान: शाहिद आफ्रिदी- १२/७ विरुद्ध वेस्ट इंडिज, २०१३
ऑस्ट्रेलिया: ग्लेन मॅकग्रा- १५/७ विरुद्ध नामिबिया, २००३
अफगाणिस्तान: राशिद खान- १८/७ विरुद्ध वेस्ट इंडीज, २०१७
श्रीलंका: वानिंदू हसरंगा- १९/७ विरुद्ध झिम्बाब्वे, २०२४

हेही वाचा – IND vs AFG 1st T20 : शिवम दुबेच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर भारताचा शानदार विजय, अफगाणिस्तानवर सहा विकेट्सनी मात

टिम साउदीलाही टाकले मागे –

घरच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यातील गोलंदाजाची ही दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी आहे. त्याने टिम साऊदीचा विक्रम मोडला. ज्याने २०१५ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३३ धावांत ७ विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत चामिंडा वास (८/१९) पहिल्या स्थानावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील पाचव्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवणाऱ्या श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगा (७/१९) याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, तर झेनिथ लियानागे (११९ धावा आणि १ बळी) याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wanindu hasaranga has broken the records of many veterans including muttiah muralitharan in sl vs zim 3rd odi vbm