Wanindu Hasaranga married his girlfriend Vindya Padmaperuma: क्रिकेट जगतात २०२३ वर्ष सुरू होताच लग्नांचा हंगाम सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेटर्सच्या लग्नांपासून ते पाकिस्तानी क्रिकेटर्स लग्नांपर्यंत या वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक खेळाडूंनी लग्न केले. दरम्यान, श्रीलंका क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने आपली गर्लफ्रेंड विंदिया पद्मपेरुमाशी लग्न केले आहे. एकीकडे श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असताना, दुसरीकडे श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंनी बुधवारी म्हणजेच ८ मार्चला लग्नगाठ बांधली.

स्टार अष्टपैलू वनिंदू हसरंगाने ८ मार्च २०२३ रोजी विंदिया पद्मपेरुमासोबत लग्नगाठ बांधली. त्याचबरोबर या स्टार कपलचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या विशेष प्रसंगी हसरंगा आणि पद्मपेरुमा यांच्यावक अनेकाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दोन्ही स्टार्सनी लग्नानंतर त्यांचे फोटोशूट केले आहे, जे क्रिकेटर आणि फोटोग्राफरने सोशल मीडियाच्या इंस्टावर शेअर केले आहेत. हे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
PM Modi
PM मोदींचा ‘मेक इन इंडिया’ पाठोपाठ आता ‘वेड इन इंडिया’वर भर; देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलही केलं मोठं वक्तव्य

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने वानिंदू हसरंगाला लग्नाची परवानगी दिली होती. त्यामुळे हसरंगा कसोटी मालिकेचा भाग नाही. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील मर्यादित षटकांची मालिका २५ मार्चपासून सुरू होणार आहे. या मालिकेत तो खेळेल अशी अपेक्षा आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून कोणतीही पुष्टी झालेली नसली, तरी आयपीएल २०२३ च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आरसीबीसाठी हसरंगा खेळणे कठीण आहे. श्रीलंकेचा न्यूझीलंड दौरा ८ एप्रिल रोजी संपणार आहे. तर आयपीएलचा १६वा सीझन ३१ मार्चपासून सुरू होत आहे. लोअर ऑर्डरमध्ये मोठे फटके मारणाऱ्या वानिंदू हसरंगासाठी शेवटची आयपीएल हंगाम शानदार होता. त्याने १८ सामन्यात २६ विकेट घेतल्या. गोलंदाजीत हसरंगा हे आरसीबीसाठी महत्त्वाचे अस्त्र आहे. मधल्या षटकांमध्ये लेग स्पिन गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना फसवण्यात तो माहीर आहे. आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो न खेळल्याने आरसीबीच्या अडचणी वाढू शकतात.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: अहमदाबाद सामन्यात विराटचा नवा पराक्रम; सचिन-कपिल सारख्या दिग्गजांच्या ‘या’ यादीमध्ये झाला सामील

वानिंदू हसरंगाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द –

या क्रिकेटपटूने त्याच्या संघासाठी (श्रीलंका) आतापर्यंत फक्त चार कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ४ बळी घेतले आहेत आणि १९६ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये, त्याने ३७ सामन्यात ३९ विकेट घेतल्या आहेत आणि ७१० धावा केल्या आहेत. हसरंगाने आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. त्याने ५५ सामन्यात ८९ विकेट घेतल्या असून ५०३ धावाही केल्या आहेत.

Story img Loader